जेवणाच्या ताटात जर चटणी किंवा लोणचं असेल तर जेवणाची चव आणखीनच सुंदर लागते. सगळ्यांचं चटपटीत पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. जेवणात कायमच कैरीचे लोणचं, मिरची लोणचं, लसूण चटणी, खोबऱ्याची चटणी इत्यादी अनेक पदार्थ खाल्ले जातात. जेवणाऱ्या बऱ्याचदा चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन चविष्ट पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही राजस्थनी पद्धतीमध्ये मिरची के टिपोरे बनवू शकता. हा ताज्या हिरव्यागार मिरच्यांपासून बनवला जातो. देशभरात अनेक वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून चविष्ट पदार्थ बनवले जातात. या पदार्थांची चव चाखण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी असते. चला तर जाणून घ्या राजस्थनी(Rajasthani) पद्धतीमध्ये झटपट मिरची के टिपोरे बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:
हिरव्या मिरच्या
धणे पावडर
जिऱ्याची पावडर
बडीशेप
लाल तिखट
हळद
मीठ
हिंग
जिरं
मोहरी
कलौंजी
काळेमीठ
आमचूर पावडर
विकेंड स्पेशल! यंदा घरी ट्राय करा मंगलोरियन स्टाईल ‘प्राॅन्स घी रोस्ट’; मसालेदार आणि सुगंधित चव मनाला करेल खुश
कृती:
मिरची के टिपोरे बनवण्यासाठी सर्वप्रथम, हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून त्यांचे देठ काढा.त्यानंतर मिरच्या मध्यम आकारात कापून घ्या. याशिवाय मिरच्यांमधील बिया काढा(Rajasthani). यामुळे मिरच्या जास्त तिखट लागणार नाहीत.भांड्यात हळद, धणे पावडर, जिरेपूड, बडिशेप पावडर, लाल तिखट घेऊन व्यवस्थित मिक्स करा. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून काहीवेळ बाजूला ठेवा.कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कलौंजी घालून फोडणी घ्या.
त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या आणि तयार केलेला सुका मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.त्यानंतर त्यात चवीनुसार काळे मीठ, आमचूर पावडर आणि साधं जेवणातील मीठ घालून मिक्स करून घ्या. मिरच्यांना एक वाफ काढून गॅस बंद करा.मिरचीचे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर काचेच्या डब्यात भरून ठेवा. यामुळे पदार्थ लवकर खराब होणार नाही.तयार आहे राजस्थनी पद्धतीमध्ये बनवलेले मिरची के टिपोरे. हा पदार्थ जेवणाची चव वाढवेल.

हेही वाचा :
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका, या बड्या नेत्याने सोडली साथ
लँडिंगवेळी विमानाच्या पंखामध्ये अडकला पतंगाचा दोरा अन्…
महिला राष्ट्राध्यक्षांवर ऑन कॅमेरा छेडछाड; मद्यधुंद अवस्थेत माणसाने केला KISS करण्याचा प्रयत्न, Video Viral