आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि हेल्दी जीवनशैली जपणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या आहारात हलके, पौष्टिक आणि घरगुती पदार्थांचा नेहमी समावेश असतो. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातही ती स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देते. गोव्यामध्ये चित्रिकरण करत असताना तिने नेहमी खाल्लेला पदार्थ म्हणजे तिचा आवडता बीटरूट(beetroot) सॅलड. गरम हवामानात थंड, हलके आणि शरीराला उर्जा देणारे हे सॅलड तिच्यासाठी परिपूर्ण पर्याय ठरले. या सॅलडमध्ये दही, मसाले आणि तडका यांचा अप्रतिम संगम आहे, ज्यामुळे त्याची चव भारतीय पारंपरिक पद्धतीने वाढते.

बीटरूट(beetroot) म्हणजे एक पौष्टिक मूळभाजी आहे. यात लोह, कॅल्शियम, फायबर आणि अनेक जीवनसत्वे असतात. यामुळे रक्तशुद्धी होते, त्वचा उजळते आणि शरीराला ताजेपणा मिळतो. अलिया भट्टसारख्या फिटनेसप्रेमी व्यक्तींसाठी हे सॅलड म्हणजे नैसर्गिक उर्जेचा स्रोत आहे. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. चला तर पाहूया तिची आवडती बीटरूट सॅलड रेसिपी कशी करायची. जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
बीटरूट उकडून किसलेले
दही
मीठ
काळी मिरी पूड
चाट मसाला
कोथिंबीर बारीक चिरलेली
तेल
मोहरी
जिरे
हिंग
कढीपत्ता काही पाने
संध्याकाळच्या हलक्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी Spring Rolls, घरातील सगळ्यांचं खूप आवडेल पदार्थ
कृती
बीटरुट सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम बीट पाण्याने धुऊन घ्या आणि उकळून मऊ करा. थंड झाल्यावर त्याचे साले काढून बारीक किसा. एका भांड्यात किसलेली बीटरूट घ्या आणि त्यात दही घाला. दोन्ही चांगले एकत्र करा. नंतर त्यात मीठ, काळी मिरी पूड, चाट मसाला आणि कोथिंबीर घालून पुन्हा हलके मिसळा.एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालून छान तडका करा. तो तडका बीटरूट-दही मिश्रणावर ओतून हलके ढवळा आणि लगेच गॅस बंद करा.
सॅलड थोडावेळ थंड होऊ द्या आणि मग सर्व्ह करा. दही जास्त गार असेल तर सॅलड अधिक ताजेतवाने लागते. तडका जास्त भाजू नये, नाहीतर कडवट चव येऊ शकते. हवे असल्यास सॅलडमध्ये थोडे भाजलेले शेंगदाणे किंवा तीळ घालता येऊ शकतो, यामुळे सॅलडची चव आणखीन वाढेल.

हेही वाचा :
मेडिकलमध्ये औषध आणायला गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार…
फक्त एका क्लिकवर परत मिळवा WhatsApp वरील डिलीट झालेले मेसेज
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी…