विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना(appearance)हिच्यासोबत ठरलेल्या लग्नाची तारीख पुढे ढकलल्यानंतर संगीतकार पलाश मुच्छल याचं पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दर्शन घडलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पलाश मुच्छल विमानतळाबाहेर चालताना दिसत आहे. पलाशसोबत त्याचे आई, वडील आणि काही टीममधील सदस्य आहेत. स्मृती मानधना हिच्यासोबतचे लग्न लांबणीवर पडल्यानंतर प्रकृती ढासळलेल्या पलाशला आराम करण्याचा सल्ला देत डॉक्टरांनी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. तर स्मृतीच्या वडिलांनाही रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र दोघांच्या लग्नाबाबत अद्याप कोणतीही नवीन माहिती समोर आलेली नाही.

पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांचा विवाह गेल्या (appearance)रविवारी २३ नोव्हेंबरला होणार असताना, अचानक स्मृतीचे वडील आजारी पडल्याने दोघांच्या लग्नाची तारीख अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. स्मृती आणि पलाश दोघांनी मिळून हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरच लग्न सोहळा पार पडेल, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. इतक्यातच स्मृतीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेले लग्नापूर्वीच्या विधींचे फोटोही डिलिट केले. त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली.
विमानतळावरील व्हिडिओमध्ये पलाशच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव दिसत नाहीत. (appearance)स्मृतीसोबत लग्न लांबणीवर पडल्यानंतर तो निराश असल्याची चर्चा आहे. तर एक व्यक्ती येऊन पलाशच्या मागून चालत असलेल्या त्याच्या आई अमिता मुच्छल यांच्या पाया पडतो, त्यानंतर त्याला आशीर्वाद देणाऱ्या आईच्या चेहऱ्यावर काही काळ हास्य उमटताना दिसत आहे.यापूर्वी, पलाश रुग्णालयात असताना त्याच्या आईने सांगितले होते की लग्न काही दिवसांनी होईल. स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीत पूर्ण सुधारणा झाल्यावरच लग्न करण्याचा दोघांचा मानस आहे. स्मृतीच्या टीमकडूनही हेच निवेदन जारी करण्यात आले होते की स्मृती आणि पलाश दोघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे, की लग्न स्मृतीचे वडील बरे झाल्यानंतरच होईल.

लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आल्यानंतर पलाशबद्दल एक अफवाही पसरली होती. पलाशचे संगीतमधील एका कोरिओग्राफर तरुणीसोबत नाव जोडण्यात आले होते. जेव्हा ही गोष्ट स्मृतीच्या वडिलांना कळली, तेव्हा त्यांच्यात वादावादी झाली आणि स्मृतीचे वडील आजारी पडल्याचंही बोललं जात होतं.पलाशने फसवणुकीच्या आरोपांवर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. स्मृतीनेही याबद्दल काहीही सांगितलेले नाही. दोघांकडूनही लग्न किंवा इतर कोणत्याही गोष्टीबाबत कोणतीही नवीन माहिती आलेली नाही. परंतु एकाच वेळी दोघांनी आपल्या सोशल मीडिया बायोमध्ये चेंज करुन ‘एव्हिल आय’ अर्थात ‘दृष्ट न लागो’ अशा आशयाची इमोजी अपडेट केली आहे.
हेही वाचा :
गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या
कार मॉडिफाय करण्याआधी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा लायसन्स होईल रद्द
‘ऐश्वर्याला मुस्लिम बनवून लग्न करणार!’, पाकिस्तानातून मौलानाचा मोठा दावा