मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनसराई सुरू आहे. (ceremony)अलिकडेच ‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाण आणि संजना यांचे लग्न पार पडले. 2 डिसेंबर रोजी अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता-निर्माता सोहम बांदेकर लग्नबंधनात अडकले आहेत. आता याच दिवशी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाड हिचे लग्न झाले असून लग्नसोहळ्याचे काही खास व्हिडिओ समोर आलेत. ऑगस्ट 2025 मध्ये प्राजक्ताने शंभुराज खुटवडशी साखरपुडा केला होता आणि आता वर्षअखेरीस ही जोडी बोहल्यावर चढली आहे.

प्राजक्ता आणि शंभुराज यांच्या लग्नाची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आहे. (ceremony)अलिकडेच अभिनेत्रीचे चुडा, मेंदी आणि घाणा भरणे हे विधी पार पडले. त्यानंतर शंभुराज आणि प्राजक्ताच्या हळद तसेच संगीत समारंभाचे धमाल व्हिडिओ-फोटोही समोर आलेले. आता 2 डिसेंबर रोजी या जोडीने लग्नगाठ बांधली.प्राजक्ताचा मनमोहक लूकप्राजक्ताने तिच्या लग्नसोहळ्यासाठी हिरव्या रंगाची जरीचे काम असणारी साडी नेसली आहे. नाकात नथ, हातभर भरलेला हिरव्या आणि सोनेरी बांगड्यांचा चुडा, साडीवर मॅचिंग फिकट हिरव्या रंगाचा शेला आणि सोन्याचे सुंदर दागिने असा पारंपरिक लूक तिने केला होता.
तिच्या या श्रृंगारामध्ये ठसठशीत मंगळसूत्राची भर पडली. (ceremony)शंभुराजने जेव्हा प्राजक्ताला मंगळसूत्र घातले तेव्हाचा क्षणही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शंभुराज आणि प्राजक्ता यांच्या सोहळ्यातील मंगळसूत्र घालण्याचा विधी, सप्तपती, वरमाला, कानपिळी अशा विविध विधींचे व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे समोर आले आहेत.प्राजक्ताच्या मंगळसूत्रासह तिने परिधान केलेल्या ब्लाऊजने विशेष लक्ष वेधले. प्राजक्ताने तिच्या साखरपुड्याच्या दिवशी ब्लाऊजवर ‘शंभुराज’च्या नावाचे नक्षीकाम केले होते.

तर आता लग्नसोहळ्यासाठी तिने सप्तपदीची सात वचने लिहिली आहे. (ceremony)नववधूंमध्ये अशा स्टाइलचा ट्रेन्ड येऊ शकते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.प्राजक्तासह शंभुराजच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास तो शाही अंदाजात तार झाला होता. पेशवाई थाटातील कुर्ता पायजमा, फेटा आणि त्यावर शोभेल अशी तलवार अशा लूकमध्ये तो लग्नमंडपात पोहोचला. नवदाम्पत्याने एकमेकांना शोभून दिसेल असा लूक केला आहे.
हेही वाचा :
गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या
कार मॉडिफाय करण्याआधी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा लायसन्स होईल रद्द
‘ऐश्वर्याला मुस्लिम बनवून लग्न करणार!’, पाकिस्तानातून मौलानाचा मोठा दावाEditEditEdit