लातूरमधून माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मेडिकल दुकानदाराने औषध खरेदी करण्यासाठी आलेल्या ९ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (raped)केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तसेच तपास करून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या. सध्या पीडित मुलीवर रूग्णालयात उपचार सुरू असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दत्ता चिमन्नशेट्टे (वय वर्ष ५२)असे आरोपीचे नाव आहे. २ नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मेडिकलमध्ये गेली होती. मेडिकलमध्ये जाऊन तिनं मानदुखी बंद होण्यासाठी गोळी मागितली. आरोपीनं चिमुकलीला झाडून काढायचे आहे, असं सांगून मेडिकलच्या वरच्या खोलीत नेले. तसेच तिच्यावर जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केला.

त्यानंतर आरोपीनं पीडितेला पंधरा रूपये दिले. पीडित मुलगी १५ रूपये घेऊन वडिलांकडे गेली. तसेच वडिलांना १५ रूपये दिले. वडिलांनी ‘मी तुला ५ रूपये दिले होते, मग बाकी पैसे कुणी दिले?’, असा सवाल उपस्थित केला. यावर पीडितेनं दत्ता मामाने दिले, असं सांगितले. तसेच वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.

वडिलांनी थेट मेडिकल गाठले. तसेच आरोपीला जाब विचारला. ‘मी कुठे काय केले?’ असं आरोपी म्हणाला. नंतर मुलीनं आरोपीनं खोलीत अत्याचार केला असल्याचं सांगितलं(raped). यानंतर वडिलांनी पोलीस ठाणे गाठले, तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आणि बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पुढील तपास पोलीस अधिकारी एन.व्ही हाश्मी करत आहेत.

हेही वाचा :

फक्त एका क्लिकवर परत मिळवा WhatsApp वरील डिलीट झालेले मेसेज
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी…
गाडी धुताना 8 वर्ष लहान गर्लफ्रेंंडसोबत रोमॅंटिक झाला हार्दिक पंड्या