पुण्यात एका सुशिक्षित आयटी इंजिनिअरची (engineer)भोंदूगिरीतून १४ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दिपक डोळस असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. शंकर महाराजांच्या नावाने आजार बरे करण्याचे आमिष दाखवून दिपक खडके आणि वेदिका पंढरपूरकर या भोंदू जोडीने हा गंडा घातला.पीडित दिपक डोळस हे काही वर्षे इंग्लंडमध्ये नोकरीला होते. त्यांच्या दोन्ही मुली नेहमी आजारी राहत असल्याने ते चिंतेत होते. याच दरम्यान, २०१८ साली त्यांची ओळख राजेंद्र उर्फ दिपक खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपूरकर यांच्याशी झाली. या दोघांनी ‘शंकर महाराज’ अंगात येत असल्याचा आणि ते कोणताही दुर्धर आजार बरा करू शकत असल्याचा दावा केला.

डोळस कुटुंबाचा विश्वास जिंकण्यासाठी, त्यांना खडकेच्या दरबारात नेण्यात आले. तिथे वेदिका पंढरपूरकर हिने तिच्या अंगात ‘शंकर महाराज’ आल्याचा खोटा आव आणला. “तुमच्या संपत्तीत दोष आहे, तीच तुमच्या मुलींच्या आजारपणाचे कारण आहे. ते धन आमच्याकडे जपून ठेवल्यास आणि त्यावर पूजा केल्यास(engineer) तुमच्या मुली बऱ्या होतील,” असा बहाणा करून या भोंदू जोडीने डोळस यांच्याकडून त्यांच्या बँकेतील सर्व ठेवी आणि बचत निधी स्वतःच्या खात्यात RTGS द्वारे वळते करून घेतले.बँक खाती रिकामी करूनही मुलींच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने, डोळस दाम्पत्याने खडके आणि पंढरपूरकर यांच्याकडे पुन्हा विचारणा केली. तेव्हा “तुमच्या राहत्या घरातच दोष आहे,” असे सांगून त्यांना घाबरवण्यात आले. या भोंदू जोडीने डोळस यांचे इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस विकण्यास भाग पाडले आणि त्यातून आलेले कोट्यवधी रुपयेही वेदिका पंढरपूरकरच्या खात्यात जमा करून घेतले.

एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी पीडितांचा पुण्यातील प्लॉट आणि राहता फ्लॅटही विकायला लावला. त्यांच्याकडून पर्सनल लोन देखील काढायला लावून, हा सर्व पैसा हडप करण्यात आला. या तब्बल १४ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या पैशातून आरोपींनी कोथरूड येथील महात्मा सोसायटीत ‘आकाशदिप’ नावाचा आलिशान बंगला खरेदी केला.

हेही वाचा :

लाडकी कोण? नावडती कोण? घराघरात भांडण… उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
ट्रेनमधून फुस्स करून फुत्कारला अजगर, पाहताच लोकांची हवा झाली टाईट; Video Viral
Vitamin D ची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, हाडांमध्ये वाढेल ताकद