उत्तराखंडच्या उधमसिंह नगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरी (bride)आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याने नवरदेव आणि त्याच्या कुटुंबावर आकाश कोसळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. बाजपूर नगरपालिका क्षेत्रातील एका वॉर्डात राहणारा नवरदेव मोठ्या उत्साहात लग्नाची तयारी करत होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. शेरवानी परिधान करून, डोक्यावर फेटा बांधून तो वरात निघण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याच क्षणी एक फोन कॉल आला आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली.

फोनवरून समजले की होणारी नवरी (bride)लग्नाच्या आदल्या रात्री आपल्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. ही माहिती मिळताच वर पक्षात गोंधळ माजला आणि सगळा आनंद क्षणात गडद झाला. संतप्त नातेवाईकांनी कोतवालीत धाव घेत वधू पक्षाविरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी पोलिसांना सांगितले की, लग्नाच्या तयारीसाठी मोठा खर्च करण्यात आला होता आणि आता या घटनेमुळे कुटुंबाला सामाजिक अपमान सहन करावा लागत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एसएसआय जसविंदर सिंह यांनी सांगितले की, हे एक कौटुंबिक प्रकरण असून दोन्ही बाजूंना मानवी दृष्टीकोनातून परस्पर सहमतीने तोडगा काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, फरार झालेली युवती आणि तिचा प्रियकर यांचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून, लग्नाच्या उत्सवात दु:खाचे सावट पसरले आहे.

हेही वाचा :
52 वर्षीय मलायका 33 वर्षीय तरुणाच्या प्रेमात
न्यूड फोटोंपासून 26 वर्ष लहान मुलीसोबत लग्न… अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला अभिनेता
केवळ 500 रुपयांत मिळतोय Apple AirTag सारखा ट्रॅकर