झगमगत्या ग्लॅमर जगतात सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची चर्चा कायम रंगत असते. यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे मॉडेल, अभिनेता आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण. वयाच्या ६०व्या वर्षीही आपल्या फिटनेस आणि अनोख्या विचारसरणीमुळे मिलिंद तरुणांना टक्कर देतो. मात्र, तो अनेकदा वादाच्या (marriage)भोवऱ्यात अडकलेला दिसतो.१९९५ मध्ये त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या फोटोशूटमुळे मिलिंदला तब्बल १४ वर्षांची कायदेशीर लढाई लढावी लागली.

त्याच्यावर जाहिरातीद्वारे अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. एवढंच नाही, तर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. २०२० मध्येही तो पुन्हा चर्चेत आला, जेव्हा तो गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर नग्न अवस्थेत धावताना दिसला.या फोटोंबाबत स्पष्टीकरण देताना मिलिंद म्हणाला होता, “देवाने आपल्याला जसे बनवले आहे, त्यात काहीही चुकीचे नाही. जगभरात इन्स्टाग्रामवर असंख्य न्यूड फोटो आहेत. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची स्वप्ने आणि अभिव्यक्ती असते.”मात्र मिलिंद सोमण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सतत चर्चेत राहिला आहे. वयाच्या ५२व्या वर्षी त्याने स्वतःपेक्षा तब्बल २६ वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोंवरशी विवाह(marriage) केला.

यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका आणि ट्रोलिंग झाली. विशेष म्हणजे, अंकिताची आईसुद्धा मिलिंदपेक्षा वयाने लहान आहे.सोशल मीडियावर मिलिंद आणि अंकिता यांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ वारंवार चर्चेत असतात. काही जण त्यांच्या नात्याचे कौतुक करतात, तर काहीजण त्यावर टीका करतात. मात्र या सर्वांनंतरही मिलिंद सोमण आपल्या विचारांशी आणि जीवनशैलीशी प्रामाणिक राहून समाजातील बंधनांना आव्हान देत जगताना दिसतो.

हेही वाचा :

विश्वविजेत्या 3 महिला खेळाडूंचा राज्य सरकार करणार सत्कार…
विश्वविजेत्या स्मृती मानधनाला मोठा धक्का…
भारताच्या चॅम्पियन खेळाडूंनी घेतला प्रेमानंद महाराज यांचे दर्शन, सोशल मिडियावर Video Viral