भारतीय महिला संघाने 2025 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाची ट्राॅफी नावावर केली आहे. यामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली. भारताच्या महिला संघाने विश्वचषकामध्ये ट्राॅफी जिंकल्यानंतर भारतामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला होता. त्याचबरोबर देशामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आता भारताच्या संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर (champion)आता भारतीय महिला खेळाडू या प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत.

प्रेमानंद महाराज यांच्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय संघाची अष्टपैलू स्नेह राणा हिने प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेतले. ती या विश्वचषकामध्ये लीग सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली होती पण तिला सेमीफायनल आणि फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. यावेळी स्नेह राणा हिने प्रेमानंद महाराज यांना काही प्रश्न विचारले आणि यावेळी महाराजांनी तिला काही आयुष्याचे मार्ग सांगितले.

२ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना टीम इंडियासाठी उल्लेखनीय होता. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी १०४ धावांची भागीदारी केली. वर्मा यांनी ८७ धावा केल्या. स्मृती मानधना यांनीही ४५ आणि दीप्ती शर्मा यांनी ५८ धावा केल्या. टीम इंडियाने ५० षटकांत ७ गडी गमावून २९८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने १०१ धावा केल्या आणि बराच वेळ टिकून राहिली. तिला इतर कोणत्याही फलंदाजाची योग्य साथ मिळाली नाही. दक्षिण आफ्रिका ४५.३ षटकांतच सर्वबाद झाली आणि टीम इंडियाला ५२ धावांनी विजय मिळवून दिला. या प्रक्रियेत दीप्ती शर्मानेही ५ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा :

१० रुपयांच्या तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल मुलायम
सोने, चांदी खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर!
चॅटजीपीटी वापरकर्त्यांसाठी मोठी खुशखबर!