दैनंदिन वापरात तुरटी(Alum) कायमच वापरली जाते. तुरटीमध्ये असलेले घटक आरोग्य सुधरण्यासाठी आणि त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मदत करतात. थंडीच्या दिवसांमध्ये पायांना खूप जास्त भेगा पडतात. पायांना पडलेल्या भेगांमधून काहीवेळा खूप जास्त रक्त सुद्धा येते. याशिवाय पायांमध्ये वाढलेल्या वेदना, पायांवरील निघालेल्या त्वचेमुळे पाय अतिशय निस्तेज आणि कोरडे दिसतात.

अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्ट आणि क्रीमचा वापर करतात. पण केमिकल युक्त प्रॉडक्टच्या वापरामुळे त्वचेवर फारसा परिणाम दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पायांवर पडलेल्या भेगा कमी करण्यासाठी तुरटीचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तुरटीच्या वापरामुळे पायांवरील नैसर्गिक चमक वाढते. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच महिला तुरटीचा वापर करतात.

तुरटीमध्ये (Alum)अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. सतत धावपळीच्या परिणामामुळे आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात वाढलेला थकवा, तणाव कमी करण्यासाठी विश्रांती घेणे आवश्यक आहे. त्वचेवर वाढलेले फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी तुरटी फायदेशीर आहे. तुरटीचा वापर पायांना केल्यास पायांची त्वचा अतिशय सुंदर आणि मुलायम होते. दिवसभर कामात किंवा प्रवासामध्ये उभं राहून पाय थकल्यानंतर गरम पाण्यात तुरटी मिक्स करून पायांना शेक द्यावा. यामुळे पायांच्या वेदनांपासून आराम मिळतो आणि पायांची गुणवत्ता सुधारते.

बूट किंवा मोजे घातल्यामुळे पायांना दुर्गंधी येते. पायांमध्ये वाढलेल्या दुर्गंधीमुळे बऱ्याचदा पायांवरील त्वचा कुजण्याची शक्यता असते. अशावेळी तुरटीच्या पाण्याचा वापर करावा. तुरटीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पाय स्वच्छ करतात. याशिवाय सतत येणाऱ्या घामामुळे पायांवरील त्वचा चिकट आणि तेलकट होऊन जाते. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीचा वापर करावा.

शरीराच्या कोणत्याही अवयवावर वाढलेले फंगल इन्फेक्शनवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुरटीचा वापर करावा. यामध्ये असलेले अँटी-फंगल प्रॉपर्टी पायांवरील अॅथलीट फूट नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. याशिवाय पायांमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी तुरटीचा वापर करावा. पायांना वाढलेली सूज कमी करण्यासाठी अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या तुरटीचा वापर करावा.

हेही वाचा :

सोने, चांदी खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर!
चॅटजीपीटी वापरकर्त्यांसाठी मोठी खुशखबर!
जुळ्या मुलांचा रंग पाहून गोऱ्यागोमट्या नवऱ्याने रुग्णालयात घातला राडा, बायको हादरली; Video Viral