कॉटन कपडे(clothes) उन्हाळ्यात सर्वाधिक वापरले जातात. हे कपडे हलके, मऊ आणि त्वचेसाठी आरामदायक असतात. पण या कपड्यांची एक मोठी समस्या म्हणजे धुताना रंग फिका होणे किंवा कपडा सैल पडणे. योग्य पद्धतीने काळजी घेतली, तर तुमचे कॉटनचे कपडे दीर्घकाळ नवेच दिसतील. चला जाणून घेऊया काही सोपे पण प्रभावी उपाय

नवीन कॉटन कपडे पहिल्यांदा वापरण्यापूर्वी नेहमी इतर कपड्यांपासून वेगळे धुवा. कारण त्यातील जास्त रंग निघण्याची शक्यता असते. यामुळे इतर कपड्यांवर रंग बसत नाही.कॉटन कपडे नेहमी थंड किंवा कोमट पाण्यात धुवावेत. गरम पाणी कपड्यांचा रंग फिक्का करते आणि तंतू सैल होतात.कठोर केमिकल असलेले डिटर्जंट वापरल्यास कपड्यांचा रंग आणि चमक कमी होते. त्यामुळे नेहमी माइल्ड, लिक्विड किंवा हर्बल डिटर्जंट वापरा.

कपडे (clothes)पहिल्यांदा धुताना पाण्यात थोडं मीठ घाला. मीठामुळे रंग स्थिर राहतो आणि लवकर फिका होत नाही.पहिल्या धुण्यात एक झाकणभर पांढरा व्हिनेगर टाकल्यास रंग टिकून राहतो आणि कपडे मऊ राहतात.वॉशिंग मशीन वापरत असाल, तर जेंटल सायकल निवडा. जास्त स्पिनमुळे कपडे सैल होतात आणि रंग उडतो.

धुताना नेहमी गडद रंगाचे (जसे की काळा, निळा, हिरवा) आणि फिकट रंगाचे कपडे वेगळे धुवा. त्यामुळे रंग मिसळण्याची शक्यता राहत नाही.कॉटन कपडे जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवू नका. यामुळे कपड्यांचा नैसर्गिक रंग आणि टेक्स्चर खराब होतो. कॉटन कपडे नेहमी थोडे ओले असताना किंवा कमी तापमानावर इस्त्री करा. जास्त उष्णतेने रंगावर परिणाम होतो आणि कपडा जळू शकतो.

हेही वाचा :

महिलेने अर्धनग्न अवस्थेतच इमारतीवरून मारली उडी, ‘त्या’ खोलीत काय सापडलं?
 एका रात्रीत सोडला होता शो, तब्बल ९ वर्षांनी परततेय ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री
महायुती फुटणार? “कोणाच्या भरवशावर…”; अजित पवारांची आमदारांना तंबी