आग्रा येथील शास्त्रीपुरम परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ‘द हेवन’ नावाच्या हॉटेलमध्ये एका महिलेने पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना समोर आली असून, ही घटना मंगळवारी दुपारी घडली. माहितीप्रमाणे, महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये होती. दरम्यान, हॉटेलवर पोलिसांचा छापा पडल्याची अफवा पसरताच बॉयफ्रेंड तेथून फरार झाला आणि घाबरलेल्या अवस्थेत महिलेने अर्धनग्न स्थितीत पहिल्या मजल्यावरून उडी(jumped) मारली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

जखमी महिलेला तत्काळ स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. घटनेनंतर महिलेचा बॉयफ्रेंड आणि हॉटेलचा स्टाफ दोघेही फरार आहेत. पोलिसांनी दोघांच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले आहे.दरम्यान, प्राथमिक चौकशीत असे स्पष्ट झाले आहे की पोलिसांनी त्या वेळी हॉटेलवर कोणतीही धाड टाकली नव्हती. एसीपी अक्षय महादिक यांनी सांगितले की, “महिला पहिल्या मजल्यावरून (jumped)पडल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. मात्र, तेथे कोणत्याही प्रकारची रेड नव्हती. आम्ही प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत.”

हॉटेलच्या खोलीची तपासणी करताना पोलिसांना ‘हॅप्पी बर्थडे’ असे लिहिलेले फुगे आणि सजावटीचे साहित्य आढळले. खोली अस्ताव्यस्त स्थितीत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले. पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, महिला आणि तिचा बॉयफ्रेंड येथे वाढदिवस साजरा करत होते.स्थानिक रहिवाशांच्या मते, या हॉटेलमध्ये वारंवार पार्ट्या आणि रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमांमुळे परिसरातील लोक त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आणि रजिस्टर जप्त केले असून, खोली बुक करण्यासाठी वापरलेले नाव आणि ओळखपत्र तपासले जात आहे. तसेच, हॉटेलच्या परवानगी व कायदेशीर बाबींचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हेही वाचा :
एका रात्रीत सोडला होता शो, तब्बल ९ वर्षांनी परततेय ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री
महायुती फुटणार? “कोणाच्या भरवशावर…”; अजित पवारांची आमदारांना तंबी
झाडावर बसून दोन घुबडांचा सुरु होता रोमान्स; महिलेने कॅमेरात कैद केले अद्भुत दृश्य; 10 करोड व्युजसह Video Viral