ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात एक संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला अत्याचार(raped) करून निर्दयपणे हत्या करण्यात आली असून तिचा मृतदेह शेतात फेकण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण ठाणे जिल्हा हादरून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना महिलेचा मृतदेह तिच्याच शेतात सापडला.

घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून आवश्यक पुरावे गोळा केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या गळ्यात ५ ते ६ तोळे सोन्याचे दागिने होते आणि ते मृतदेहावरच असल्याने या गुन्ह्यामागे चोरीचा हेतू नसावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्यावर बलात्कार (raped)आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, ठाणे जिल्ह्यात या घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस उपअधीक्षक राहुल झाल्टे यांनी या संदर्भात माहिती देताना गुन्हेगारास कठोर शिक्षा होईल, असे सांगितले आहे. या घटनेबाबत पीटीआयने वृत्त दिले आहे.

हेही वाचा :

30 वर्षांनंतर ‘या’ राशींवर शनिदेव झाले प्रसन्न 5 डिसेंबरपर्यंत सोन्याचे दिवस
कॉटन कपडे धुताना रंग उडू नयेत यासाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स…
महिलेने अर्धनग्न अवस्थेतच इमारतीवरून मारली उडी, ‘त्या’ खोलीत काय सापडलं?