जयसिंगपूर – शिरोळ तालुक्यातील उदगाव (ता. शिरोळ) येथे बनावट नोटा (currency)तयार करणाऱ्या टोळीचा जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी मध्यरात्री पर्दाफाश केला आहे. बुधवारी (दि. २९) मध्यरात्री चिंचवाड रोडवरील जनावरांच्या गोट्यामध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ₹६८,४०० किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या असून या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. चौकशीदरम्यान असे समोर आले की, इचलकरंजी आणि दानोळी येथील काही तरुण या रॅकेटमध्ये सामील होते. त्यापैकी इचलकरंजीतील एका तरुणाला अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेले प्रिंटर, इंक आणि कागदाचे साहित्य जप्त केले आहे.

सध्या जयसिंगपूर पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत आणखी काही जणांचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही(currency). पोलिस या प्रकरणाचा तपास अधिक गतीने करत आहेत.या घटनेमुळे शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये बनावट नोटा प्रकरणाची भर पडली आहे.

हेही वाचा :

मिथुन चक्रवर्तींची सून, स्टार अभिनेत्री; तरीसुद्धा झालेली कास्टिंग काऊचची शिकार
३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण ..Video व्हायरल
लाडकीच्या खात्यात १५ दिवसात ₹३००० येणार