कडवी धरण क्षेत्रालगतच्या शेतात शेळ्या पालन करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या हत्येने(Murder) शाहूवाडी तालुका हादरला होता. सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्याची शंका व्यक्त केली जात होती, मात्र आता या प्रकरणाचा पोलिसांनी मानवहत्या म्हणून तपास सुरू केला असून, एका संशयिताला ताब्यात घेतल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाईपैकी गोलिवणे वसाहत येथे 19 ऑक्टोबर रोजी निनू यशवंत कंक (वय 75) आणि त्यांची पत्नी रखुबाई निनू कंक (वय 69) यांचा त्यांच्या शेड परिसरात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह (Murder)आढळला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सुरुवातीला वन्यप्राण्याच्या हल्ल्याची शक्यता तपासात पुढे आली होती. मात्र शवविच्छेदन अहवाल आणि घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांवरून पोलिसांनी मानवी हस्तक्षेपाची शक्यता नाकारता येत नाही, असा निष्कर्ष काढला. त्यानंतर शाहूवाडी पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त पथकाने तपासाचा वेग वाढवला.

चौकशीत काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून, एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. तपासातील प्राथमिक माहिती अत्यंत संवेदनशील असल्याने पोलिसांनी गोपनीयता पाळली आहे. तथापि, शुक्रवारी या क्रूर हत्येचा उलगडा होण्याची शक्यता वरिष्ठ पोलिस सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.या घटनेने केवळ परळे निनाई नव्हे, तर संपूर्ण शाहूवाडी तालुका हादरून गेला आहे. ऐन दिवाळीत वृद्ध दाम्पत्याची अशा पद्धतीने हत्या झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :

पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर… घटनेचा थरारक Video Viral
71 वर्षीय अभिनेत्याचा 39 वर्षीय अभिनेत्रीसोबत स्टंट
सकाळी रिकाम्या पोटी प्या ‘या’ दाण्याचे पाणी शरीरातील समस्या होतील झटक्यात दूर