कलाकार म्हटलं की स्टंट हे आलेच. अनेक चित्रपटासाठी कलाकार स्वतःच स्ंटट करतात. मात्र बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते टिकू तस्लानिया यांना एक स्टंट (stunt)करणे महागात पडलं आहे. 71 वर्षीय टिकू तल्सानिया यांचा एक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ व्हायरल होताच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, त्यांना माफीदेखील मागावी लागली आहे.

टिकू तस्लानिया हे सध्या त्यांचा आगामी चित्रपट मिसरीबाबत चर्चेत आहेत. गुजरातच्या सिनेमागृहात आज म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टिकू यांच्याबरोबरच अभिनेत्री मानसी पारेख आणि रौनक कामदार यांच्या मुख्य भूमिका आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कलाकारांनी त्यांचा जीव धोक्यात घालून स्टंट(stunt) केल्याची चर्चा आहे. याचा व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे.

अहमदाबादच्या रस्त्यावर बाइकवर स्टंट करत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. समोर आलेल्या व्हिडिओत अभिनेता विना हेल्मेट रस्तांवर बाईक चालवताना स्टंट करत असल्याचं समोर आलं आहे. या स्टंटसाठी मिसरीच्या टीमने पोलिसांची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. व्हायरल झालेल्या एका क्लिपमध्ये, मानसी चालत्या बाईकवर उभी राहून आयकॉनिक टायटॅनिक पोज पुन्हा तयार करताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये टिकू तलसानिया बाईक चालवताना उभा असल्याचे दाखवले आहे. शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर चित्रित केलेल्या या स्टंटमुळे रस्ता सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी गुजराती चित्रपट मिसरीच्या कलाकारांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. वाहतूक पोलिसांनी ट्रॅफिक पोलिसांवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. बाईक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर मागणी केली होती की, वाहतूकीचे नियम तोडणाऱ्या कलाकारांवर कारवाई व्हायला पाहिजे. सोशल मीडियावर राज्याचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि डीजीपी विकास सहाय यांच्याकडे ही कारवाईची मागणी केली जात होती. मात्र कारवाई झाल्यानंतर टिकू यांनी माफी मागितली आहे.

मानसी पारेख आणि टिकू तलसानिया यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तथापि, या घटनेमुळे सोशल मीडियावर वाद सुरू आहेत. काही जणांनुसार की ही केवळ एक प्रमोशनल इव्हेंट होता, तर काहींनी हे “धोकादायक आणि बेजबाबदार” कृत्य असल्याचे म्हटले आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी अशा प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा आणि सार्वजनिक माफी अनिवार्य करावी अशी मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात कोणताही कलाकार अशा प्रकारचे स्टंट करण्यापूर्वी दोनदा विचार करतील.

हेही वाचा :

सकाळी रिकाम्या पोटी प्या ‘या’ दाण्याचे पाणी शरीरातील समस्या होतील झटक्यात दूर
म्हशीच्या वर दुसरी म्हैस अन् त्यावर बसून माणूस करतोय सफर… पाहून सर्वच पडले गोंधळात; Video Viral
अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश