बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आणि “डिस्को डान्सर” म्हणून ओळखले जाणारे मिथुन चक्रवर्ती यांच्या कुटुंबातील सून मदालसा शर्मा सध्या चर्चेत आली(casting) आहे. मदालसा, जी लोकप्रिय टीव्ही शो अनुपमा मधील आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते, तिने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून बाहेर पडण्यामागचं खऱं कारण उघड केलं आहे.

मदालसाने सांगितलं की, तिला साऊथ इंडस्ट्रीत काही अप्रिय आणि अस्वस्थ करणारे अनुभव आले होते, ज्यामुळे तिने त्या क्षेत्रातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. “मला काही खराब अनुभव आले होते… जे मी अजिबात सहन करू शकले नाही. मला आठवतं, मी फक्त १७ वर्षांची होते आणि एका मीटिंगदरम्यान मला इतकं अस्वस्थ वाटलं की मी लगेच उठून बाहेर पडले आणि ठरवलं — आता मुंबईला परत जायचं,” असं मदालसाने स्पष्ट सांगितलं.
ती पुढे म्हणाली की, “कास्टिंग काउच आणि इतर अनेक गोष्टी प्रत्येक ठिकाणी असतात, पण मला माझ्या आत्मसन्मानाशी तडजोड करणं कधीच मान्य नव्हतं. माझं लक्ष्य आणि महत्त्वाकांक्षा आहेत, पण त्या इतक्या मोठ्या नाहीत की मी माझे मूल्य विसरेन. कोणती गोष्ट मला हवी आहे आणि कोणत्या किमतीवर ती घ्यायची आहे, याचा मी नेहमी विचार करते.”

मदालसा शर्माने 2009 मध्ये तेलुगु चित्रपट फिटिंग मास्टर मधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने शौर्य, आलस्याम अमृतम, थम्बिकु इंधा ऊरु, मेम वयासुकु वाचम, पथयेरम कोडी, डोव आणि सुपर 2 यांसारख्या अनेक प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम केलं. नंतर ती(casting) बॉलिवूडमध्येही झळकली आणि राजश्री प्रॉडक्शनच्या सम्राट अँड कंपनी आणि विवेक अग्निहोत्रीच्या द बंगाल फाइल्समध्ये आपल्या भूमिकांमुळे चर्चेत आली.मिथुन चक्रवर्ती यांची सून असलेली मदालसा आज स्वतःच्या मेहनतीवर आणि तत्त्वनिष्ठ भूमिकांवर बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे.
हेही वाचा :
३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण ..Video व्हायरल
लाडकीच्या खात्यात १५ दिवसात ₹३००० येणार
Samsung Galaxy S26 Ultra कधी होणार लाँच