अहमदाबादच्या नोबल नगर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे. शिव बंगला परिसरात रस्त्यावर खेळत असलेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर (girl)अचानक एक कार धडकली आणि तिच्या अंगावरून गेली. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे, काही क्षणांनी ती चिमुरडी स्वतः उभी राहिली आणि धावू लागली. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

स्थानिक नागरिकांनी तत्काळ मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने डॉक्टरांनी मुलीला किरकोळ दुखापत झाल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला (girl)ताब्यात घेतलं असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, कार ही त्या मुलाच्या कुटुंबाची होती आणि तो परवान्याविना वाहन चालवत होता.
अहमदाबाद
— Naresh Parmar (@nareshsinh_007) October 29, 2025
नोबलनगर इलाके में कार चालक ने बच्ची को कुचला
हादसे में 3 साल की बच्ची का बचाव
नाबालिग किशोर ने बच्ची को कार से कुचला
बच्ची बंगले के कोमन प्लॉट में खेल रही थी#Accident #CCTV #Gujarat #Ahmedabad pic.twitter.com/pC5bZxu1BY
या घटनेचा व्हिडिओ पाहून लोकांमध्ये संताप आणि आश्चर्य दोन्हीची भावना निर्माण झाली आहे. काहींनी याला “देवीचा चमत्कार” म्हणत मुलीच्या जीव वाचल्याचा आनंद व्यक्त केला आहे, तर काहींनी पालकांच्या निष्काळजीपणावर कठोर टीका केली आहे.स्थानिकांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली असून, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

हेही वाचा :
लाडकीच्या खात्यात १५ दिवसात ₹३००० येणार
Samsung Galaxy S26 Ultra कधी होणार लाँच
सरकारी कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका आता डिजिटल; एका क्लिकवर मिळणार माहिती