सोशल मिडियावर सध्या एका कार अपघाताचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओ(video) देहरादूनचा असून यातील दृश्यांनी आता सर्वांनाच हादरवून सोडले आहे. देहरादूनमधील कलसी-चक्रता रस्त्यावर जाजरेडपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर एका पिकअप ट्रकला अचानक आग लागली, ज्यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला. मुख्य म्हणजे कार भीषणरित्या जळत असतानाही कारचालकाने जळत्या गाडीत बसून सुमारे एक किलोमीटरपर्यंत तिला चालवत नेले. यामुळे इतर कुणालाही त्रास होऊ नये आणि गाडी योग्य ठिकाणी विझावी यासाठी चालकाने तिला दुसऱ्या ठिकाणी नेले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. घटनेविषयी चला सविस्तर जाणून घेऊया.

माहितीनुसार, या गाडीत पेंढा भरला होता. चालक संजू आणि ऑपरेटर राहुल यांनी स्वतःच्या जीवाच्या भीतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग नियंत्रित झाल्यानंतर चालकाने या जळत्या गाडीला सुमारे एक किलोमीटरपर्यंत ओढत नेऊन योग्य ठिकाणी पोहचवले. दोन्ही तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला, आजूबाजूचा परिसर आणि जीवित आणि मालमत्ता वाचवली. तथापि, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाहन पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेत दोन्हीही व्यक्ती सुखरुप आहेत आणि यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटना अकस्मात घडली पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे कुणालाही कोणतीही हानी झाली नाही.
रौंगटे खड़े कर देने वाला दृश्य।
— Ajit Singh Rathi (@AjitSinghRathi) October 30, 2025
सड़क पर दौड़ते हुए अचानक आग का गोला बन गई पिकअप गाड़ी। विकासनगर से कालसी जा रही इस गाड़ी में पराली भरी थी, आग लगने का पता नहीं चला, गाड़ी तो पूरी जल गई लेकिन ऊपर वाले का शुक्र है कि कोई जनहानि नहीं हुई। #vikasnagar #kaalsi #chakrata #Dehradun… pic.twitter.com/lED46jTLtR
या घटनेचा व्हिडिओ @AjitSinghRathi नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘रस्त्याने जात असताना एका पिकअप ट्रकला अचानक आग लागली. विकासनगरहून कालसीला जाणाऱ्या आणि पेंढ्याने भरलेल्या या वाहनाला आग लागल्याचे लगेच कळले नाही. वाहन पूर्णपणे जळून खाक झाले, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही’.

व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो(video) युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो स्वतःचा जीव धोक्यात घालून गाडी चालवत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, त्याची पिकअप गाडी हरवल्याबद्दल तो किती दुःखी आहे, तो त्याच्या भावाला वाचवण्यासाठी किती प्रयत्न करत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पेंढा पूर्णपणे झाकून ठेवावा आणि झाकून ठेवावा”.
हेही वाचा :
सकाळी रिकाम्या पोटी प्या ‘या’ दाण्याचे पाणी शरीरातील समस्या होतील झटक्यात दूर
म्हशीच्या वर दुसरी म्हैस अन् त्यावर बसून माणूस करतोय सफर… पाहून सर्वच पडले गोंधळात; Video Viral
अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
