गुरुवारी दुपारी मुंबईत घडलेली एक थरारक घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली. पवईतील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्याचा अखेर पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिसांनी तातडीने आणि धाडसी पद्धतीने केलेल्या कारवाईमुळे सर्व ओलीस सुखरूप वाचवण्यात यश आले.सुरुवातीला ही घटना समोर आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. आरोपी रोहित आर्यने (suicide)मुलांना ‘ऑडिशन’च्या बहाण्याने स्टुडिओत बोलावलं आणि त्यानंतर त्यांना एका खोलीत बंद करून ओलीस ठेवलं. एवढंच नव्हे, तर त्याने स्वतःचा एक व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर प्रसारित केला, ज्यात त्याने म्हटलं होतं —

“मी आत्महत्या करण्याऐवजी ही योजना आखली आहे. मला काही लोकांशी बोलायचं आहे आणि काही प्रश्न विचारायचे आहेत. मी दहशतवादी नाही, पैसे मागत नाही, फक्त चर्चा हवी आहे.”या व्हिडीओमध्ये रोहित आर्यने पुढे धमकी दिली होती की,
“तुमच्या एका चुकीच्या हालचालीमुळे मी संपूर्ण जागेला आग लावू शकतो. मी मेलो की नाही, त्याने काही फरक नाही, पण मुलांना इजा होईल.”घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तात्काळ स्टुडिओला वेढा घातला. परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला. पालक आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी जमले होते. परिस्थिती अतिशय तणावपूर्ण होती.

पोलिसांनी शांतता राखत समुपदेशन आणि निगोशिएशन सुरू केले, पण आरोपीने आत्मसमर्पण (suicide)करण्यास नकार दिला. शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांना एन्काऊंटर करावा लागला, ज्यात रोहित आर्या ठार झाला.मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि धाडसी कारवाईमुळे सर्व १७ मुलांसह इतर दोन जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.या घटनेनंतर पालकांनी पोलिसांचे आभार मानले असून, नागरिकांनी त्यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे.

हेही वाचा :

पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर… घटनेचा थरारक Video Viral
71 वर्षीय अभिनेत्याचा 39 वर्षीय अभिनेत्रीसोबत स्टंट
सकाळी रिकाम्या पोटी प्या ‘या’ दाण्याचे पाणी शरीरातील समस्या होतील झटक्यात दूर