सोशल मिडियाद्वारे अनेक नवीन घटना आपल्या नजरेसमोर येत असतात आणि अशाच एका घटनेने आता इंटरनेटवर धुमाकूळ माजवला आहे. स्पेनमध्ये जाएन या डोंगराळ प्रदेशात एक अनोखा आणि सुंदर प्राणी आढळून आला आहे. सहसा ही जंगली मांजरीसारखी प्रजाती सोनेरी किंवा तपकिरी रंगाची असते, परंतू यात हा मांजरीप्रमाणे दिसणारा हा प्राणी संपूर्णपणे पांढऱ्या रंगाचा आहे. त्याच्या या अनोख्या आणि दुर्मिळ साैंदर्याने (eyes)आता सर्वांना भूरळ घातली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चला याविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या दुर्मिळ प्राण्याचा व्हिडिओ स्पॅनिश वाईल्डलाईफ फोटोग्राफर अँजेल हिडाल्गो याने आपल्या कॅमेरात टिपला आहे. तो म्हणाला, “मी वर्षानुवर्षे कॅमेरे लावत आहे, अनेक प्रयत्न अयशस्वी झाले, परंतु यावेळी निसर्गाने मला असे काही दिले जे मी आयुष्यभर लक्षात ठेवेन.” या प्राण्याला इबेरियन लिंक्स असे म्हटले जात असून त्याचे पांढरे रुप फार दुर्मिळ आहे. या लिंक्सला ल्युसिझम नावाचा एक दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे, ज्यामुळे त्याची त्वचा फिकट रंगाची होते.

तथापि, अल्बिनो प्राण्यांपेक्षा वेगळे, त्याचे डोळे आणि शरीर पूर्णपणे सामान्य आहे. याचा अर्थ असा की पांढरा असूनही, तो पूर्णपणे निरोगी आहे. हा प्राणी इतका दुर्मिळ आहे की तो एखाद्या परीकथेतील जादुई प्राण्यासारखा तो वाटत आहे. जगातील दुर्मिळ वन्य मांजरींपैकी एक असलेली ही प्रजाती दोन दशकांपूर्वी नामशेष होण्याच्या मार्गावर होती, जेव्हा तिची संख्या १०० पेक्षा कमी झाली होती. अशात व्हायरल झालेल्या त्याच्या दृश्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

हे दश्य हा व्हायरल व्हिडिओ @Breaking911 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सर्व माहिती देण्यात आली असून यात लिहिले आहे की, ‘दक्षिण स्पेनमधील एका छायाचित्रकाराने पहिल्यांदाच आढळणारा पांढरा इबेरियन लिंक्स, एक ल्युसिस्टिक मोठी मांजर, जो दुर्मिळ आहे आणि जवळजवळ काल्पनिक वाटतो, त्याचे छायाचित्रण केले. जगातील दुर्मिळ मांजरींपैकी एक असलेल्या इबेरियन लिंक्सची लोकसंख्या दोन दशकांपूर्वी १०० पेक्षा कमी झाल्यानंतर तिला नामशेष होण्याच्या मार्गावरून मागे घेण्यात आले’.

व्हिडिओला आतापर्यंत 46 मिलियनहून अधिकच्या व्युज मिळाल्या(eyes) असून लाखो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काल्पनिक की फक्त उत्क्रांती?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो एका 3D अ‍ॅनिमेटेड पात्रासारखा दिसतो पण मला त्याचे कारण समजावून सांगता येत नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ते खरे आहे की एआय आहे हे मला कळत नाही”.

हेही वाचा :

युजर्सना मिळणार स्वातंत्र्य! Insta देणार तुमच्या पसंतीच्या Reels पाहण्याचा पर्याय
शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला पाठवला भाजपचा कार्यकर्ता…
मी रोहित आर्या, आत्महत्या करण्यापेक्षा मी…; 17 मुलांचं अपहरण करणाऱ्या…