सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे, जिथे नेहमीच विविध प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात तर कधी थक्क करतात अशातच आता इंटरनेटवर एक रंजक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात महिलेने (woman)एका कारचालकाला चांगलीच अद्दल घडवल्याचे दिसून आले. व्हिडिओमध्ये एक कार महिलेच्या बाजूने इतक्या वेगाने जाते की तिच्या अंगावर संपूर्ण चिखल उडतो. आपल्या कपड्यांना असं खराब झाल्याचं पाहून महिला संतापते आणि चालकाला धडा देण्याचा निर्धार करते. यानंतर महिला जे करते ते पाहून सर्वच तिच्या हुशारीची प्रशंसा करु लागता. चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते जाणून घेऊया.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये, एका कार चालक आणि एका मुलीमधील कहाणी लोकांना हसवते आणि विचार करायला लावते. व्हिडिओची सुरुवात एका चिखलाच्या रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या कारने होते. रस्त्याच्या कडेला एक मुलगी जात आहे. अचानक, गाडीच्या चाकांमधून चिखल उडतो आणि थेट मुलीवर पडतो. तिचे कपडे मलिन होतात आणि तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसतो. ती लगेच एक(woman) दगड उचलते, पण तोपर्यंत गाडी निघून गेलेली असते. थोड्या वेळाने, तीच गाडी परत येते, त्याच मार्गाने. ती मुलगी रस्त्याच्या मधोमध उभी राहून गाडी थांबवते. सुरुवातीला ड्रायव्हर थोडा घाबरतो, पण नंतर थांबतो. एकही शब्द न बोलता, ती मुलगी त्याला गाडीतून उतरण्यास सांगते. ड्रायव्हर सहमत होतो आणि बाजूला बसतो.
बदला हो तों ऐसा 😂
— kittu (@bhavisha333) October 30, 2025
वाह दीदी वाह दील खुश कर दिया 😛 pic.twitter.com/x5sNqqMLaj
पुढे जे घडते ते थेट चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नाही. मुलगी ड्रायव्हरच्या सीटवर बसते, इंजिन सुरू करते आणि त्याच चिखलाच्या रस्त्यावरून वेग घेते. काही सेकंदातच चिखल उडतो आणि ड्रायव्हरवरच्या अंगावर पडतो. चिखल अंगावर उडल्यानंतर मुलीला काय वाटलं असेल याचा अनुभव डॅायव्हरला होतो. मुलगी एकदा नाही तर दोनदा हा चिखल त्याच्या अंगावर उडवते जे पाहून विनोदी परिस्थिती निर्माण होते. मुलीच्या या कल्पनेचे यूजर्सने समर्थन केले असून लोकांना हा व्हिडिओ चांगलाच आवडला आहे.

या घटनेचा व्हिडिओ @bhavisha333 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘बदला असावा तर असा, व्वा ताई तू तर मन खुश केलं’. व्हिडिओला आतापर्यंत 51 हजाराहून अधिकच्या व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावाने चुकीच्या व्यक्तीसोबत पंगा घेतला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिने बरोबर केलं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ताई तर बदला घेणाऱ्या निघाल्या”.
हेही वाचा :
खासदार संजय राऊत घेणार राजकीय ब्रेक,नेमकं कारण काय?
महिमा चौधरीचा पूर्व पती कोण? आता दुसऱ्या लग्नाच्या चर्चा
आता घरबसल्या करा लाडकी बहीण योजनेची ई- केवायसी
