सोशल मिडियाच्या जगात काही ना काही घडत असतंच. इथे अनेक असे व्हिडिओ शेअर केले जातात जे पाहून आपलं मनोरंजन होईल. इथे हास्यास्पद, भावूक करणारे तसेच आपल्याला थक्क करणारे व्हिडिओज नेहमीच शेअर होत असतात. अशातच आता इथे आणखीन एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पती(husband)-पत्नीच्या नात्याशी संबंधित आहे. व्हिडिओमध्ये पती आपल्या प्रेयसीला भेटायला जात असतो, परंतु त्याच्या पत्नीला या गोष्टीचा आधीच सुगावा लागतो, ज्यानंतर ती त्याच्या मागे मागे त्याच्या प्रेयसीकडे जाते. आता पती, पत्नी आणि त्याची प्रेयसी असे सर्वच जेव्हा आमने-सामने भिडणार तेव्हा काय घडेल याचा विचार करा… व्हिडिओमध्ये मात्र पुढे फार मोठा राडा घडून आला आणि याच हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, तुम्हाला पत्नी हॉटेलच्या खोलीबाहेर उभी असलेली दिसेल जिथे नवरा त्याच्या प्रेयसीसोबत लपला आहे. व्हिडिओमध्ये पुढे, तुम्हाला पत्नी ओरडताना आणि दार उघडण्यास सांगताना दिसून येईल. संतप्त पत्नी खोलीचा दरवाजा तोडण्याची धमकी देखील देते ज्यानंतर नवरा संकोचून दार उघडतो. यानंतर जे पुढे जे घडते ते सर्वांना थक्क करते. पती (husband)दार उघडून बाहेर येताच पत्नी त्याच्यावर हल्ला चढवते आणि त्याला बेदम मारहाण करु लागते. इतकंच काय तर यात एक क्षण असाही येतो ज्यात ती आपल्या ओढणीने पतीचा गळा आवळण्याचा प्रयत्न करते. पतीने केलेला विश्वासघात तिच्या मनाला दु:ख देऊन जाते. ती त्याला पाहता क्षणीच संतापते आणि आपला सगळा राग त्याच्यावर काढू लागते.
Extra-Marital affair Kalesh (Wife Caught her husband with some other lady inside Hotel Room)
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 29, 2025
pic.twitter.com/E6pgGPjRBp
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तेथीलच एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला असावा, ज्यानंतर आता हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. पत्नीचा संताप अनेकांना घाबरवतो पण त्यामागील तिच्या भावनाही लोकांना पटतात. हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आता डिवोर्स होईल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाकी सर्वांआधी महिलांना कशा सर्व गोष्टी माहिती पडतात ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिने जे काही केलं ते बरोबर आहे”.

हेही वाचा :
खासदार संजय राऊत घेणार राजकीय ब्रेक,नेमकं कारण काय?
महिमा चौधरीचा पूर्व पती कोण? आता दुसऱ्या लग्नाच्या चर्चा
आता घरबसल्या करा लाडकी बहीण योजनेची ई- केवायसी
