महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. खासदार संजय राऊत हे सार्वजनिक जीवनातून दोन महिन्यांसाठी ब्रेक घेणार आहे. खासदार संजय राऊत यांच्या गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संजय राऊत यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका(political) होणार आहेत. मात्र त्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी प्रकृतीच्या कारणावरुन ब्रेक घेण्याचे ठरवले असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

खासदार संजय राऊत यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता थेट नवीन वर्षात सार्वजनिक जीवनात परतणार आहेत. मात्र, मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना खासदार राऊत यांनी घेतलेला निर्णय धक्कादायक मानला जात आहे. शिवसेनेची भूमिका स्प।ष्ट करण्यात खासदार राऊत अग्रस्थानी असतात. मात्र आता त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत घोषणा केली आहे. तसेच कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र देखील लिहिले आहे. खासदार राऊत यांनी लिहिले आहे की, सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती जय महाराष्ट्र आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या, असे खासदार संजय राऊत यांनी लिहिले आहे.

खासदार संजय राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत. राजकीय घटनांवर खासदार संजय राऊत हे शिवसेना ठाकरे गटाची भूमिका मांडत असतात. 2019 साली स्थापन झालेल्या महाविकास (political)आघाडीच्या निर्मितीमध्ये खासदार संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची ठरली. जवळपास दररोज खासदार संजय राऊत हे पत्रकारांशी संवाद साधून सत्ताधारी महायुतीवर जोरदार निशाणा साधत असतात. यानंतर आता पुढील दोन महिने खासदार राऊत हे सार्वजनिक जीवनातून ब्रेक घेणार आहेत.

हेही वाचा :

महिमा चौधरीचा पूर्व पती कोण? आता दुसऱ्या लग्नाच्या चर्चा
आता घरबसल्या करा लाडकी बहीण योजनेची ई- केवायसी
फक्त 6522 रुपयांच्या EMI वर मिळेल Tata Motors ची ‘ही’ लोकप्रिय कार