राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (elections)बिगुल वाजला असून, राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पक्षांतराच्या लाटेने तापलेल्या वातावरणात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जळगावमध्ये ठाकरे गटातील १३ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. यामध्ये माजी महापौर आणि ठाकरे गटाचे नेते नितीन लढ्ढा यांच्यासह अनेक प्रभावी नगरसेवकांचा समावेश आहे. आज दुपारी चार वाजता जळगाव भाजप जिल्हा कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांचा औपचारिक प्रवेश होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून या नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती, मात्र योग्य वेळ मिळत नसल्याने हा प्रवेश रखडला होता. अखेर आज प्रवेशाचा मुहूर्त (elections)निश्चित झाला असून, यामुळे जळगावमधील भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. दुसरीकडे, ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते भाजपकडे वळल्याने स्थानिक संघटनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपच्या इनकमिंगमुळे केवळ महाविकास आघाडीच नव्हे, तर महायुतीतीलही काही मतभेद उघड झाले आहेत. काही ठिकाणी भाजपने आपल्याच मित्र पक्षांतील नेत्यांना सामावून घेतल्याने नाराजीचे सूर उमटले आहेत. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. या घडामोडींवरून येत्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि राजकीय उलथापालथ घडविणाऱ्या ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा :
पांढरे केस, टोकदार कान अन् घारे डोळे… आढळली सर्वात दुर्मिळ मांजर! हिच्या दृश्यांनी सर्वांनाच केलं घायाळ; Video Viral
सरकारने शेतकऱ्यांना फसवलं, मनोज जरांगेंची कर्जमाफी प्रकरणात सरकारवर सडकून टीका
युजर्सना मिळणार स्वातंत्र्य! Insta देणार तुमच्या पसंतीच्या Reels पाहण्याचा पर्याय
