शेतकऱ्यांच्या (farmers)सातबाऱ्यावरून कर्जमाफीची मागणी करत बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सरकारने ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले. मात्र या आश्वासनावरून राज्यात नव्या वादळाला तोंड फुटले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर सडकून टीका करत हे आश्वासन म्हणजे “शेतकऱ्यांची सरळ फसवणूक” असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

जरांगे म्हणाले —

“सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फसवलं आहे. 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी म्हणजे तोपर्यंत शेतकरी मेलाच ना! तुम्ही म्हणताय सहा महिन्यांनी देऊ, मग तोपर्यंत शेतकरी कसा जगणार? हे विश्वास ठेवण्यासारखं नाही. हे सरकार मोगलांपेक्षा क्रूर आहे आणि सूडभावनेने वागत आहे.”

त्यांनी पुढे इशारा देत म्हटलं —

“शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या. समिती, बैठका, प्रक्रिया काही नकोत — फक्त कर्जमाफी हवी. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू. शेतकऱ्यांनी (farmers)कुणावरही विश्वास ठेवू नये, आता दंडुके हाती घेण्याची वेळ आली आहे.”

जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली.

“फडणवीस हे असे आहेत की, ते एकदा गोड बोलतात आणि दुसरा डाव टाकतात. एकीकडे म्हणतात ओबीसींना धक्का नाही, तर दुसरीकडे जीआर काढतात. मग प्रमाणपत्र कधी देणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना जरांगे म्हणाले —

“आता मराठा पेटणार नाहीत. आमचा जीआर निघाला आहे. हैदराबाद संस्थानचा जीआर आल्याने गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठे दमाने आरक्षणात सामील होणार.”

शेवटी जरांगे यांनी मराठा समाजाला आवाहन केलं —

“मराठ्यांनी आपल्या जीआर प्रमाणपत्रांची छायाचित्रे फेसबुकवर टाकू नयेत. सरकार पुढील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही.”

हेही वाचा :

युजर्सना मिळणार स्वातंत्र्य! Insta देणार तुमच्या पसंतीच्या Reels पाहण्याचा पर्याय
शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला पाठवला भाजपचा कार्यकर्ता…
मी रोहित आर्या, आत्महत्या करण्यापेक्षा मी…; 17 मुलांचं अपहरण करणाऱ्या…