राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागल्याने सर्वच पक्षांनी तयारी गतीमान केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार स्वतः निवडणूक तयारीचा आढावा घेत असून, त्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीतून (meeting)एक धक्कादायक वाद निर्माण झाला आहे.या बैठकीत सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी स्वतःऐवजी भाजप कार्यकर्त्याला उपस्थित पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूरच्या राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत झालेल्या या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांच्या तयारीवर चर्चा झाली. मात्र सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे बैठकीस अनुपस्थित होते. त्यांच्या ऐवजी महेश गाडेकर नावाच्या व्यक्तीला त्यांनी प्रतिनिधी म्हणून पाठवले. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, महेश गाडेकर हे प्रत्यक्षात भाजपचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे(meeting) नाहीत.या आरोपानंतर पक्षात संताप व्यक्त होत असून, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी या प्रकरणाबाबत खरटमल यांना जाब विचारला आहे. प्रत्युत्तरादाखल खरटमल यांनी स्पष्टीकरण दिले की —

“महेश गाडेकर हे माझे मित्र आहेत आणि ते राष्ट्रवादीच आहेत. माझं तिकीट निश्चित झालं नव्हतं, त्यामुळे मी स्वतः उपस्थित राहू शकलो नाही. म्हणूनच त्यांना बैठकीत पाठवलं.”तथापि, पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी या स्पष्टीकरणावर समाधानी नसल्याचे समजते. गाडेकर हे भाजपशी संबंधित असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा (meeting)केला आहे. त्यामुळे सोलापूरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटात अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत.दरम्यान, शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत स्थानिक निवडणुकांसाठी रणनिती ठरविण्यात आली होती. मात्र या वादामुळे पक्षाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
हेही वाचा :
पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर… घटनेचा थरारक Video Viral
71 वर्षीय अभिनेत्याचा 39 वर्षीय अभिनेत्रीसोबत स्टंट
सकाळी रिकाम्या पोटी प्या ‘या’ दाण्याचे पाणी शरीरातील समस्या होतील झटक्यात दूर
