कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
निंदकाचे घर असावे शेजारी(neighbor) असे म्हटले जाते. कारण त्याच्यामुळे आपणातील उणिवा आणि दोष लवकर समजतात, पण उचापतखोर शेजारी असेल तर त्याचा त्रास अधिक असतो. शेजारी चांगला असेल तर आपले आयुष्य सुखकारक बनते. त्याच्यामुळे आपल्या घरात शांतता आणि सौख्य नांदते. अनेकदा असेही अनुभवाला येते की, आपण शेजाऱ्याशी चांगले वागतो, त्याचा सन्मान राखतो पण त्याच्याकडून तसाच व्यवहार होतो असे नाही. बांगलादेशाचे निर्माण केवळ भारतामुळे झाले. त्यांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून भारतीय सैनिकांनी आपले रक्त सांडले. पण या शेजाऱ्याने उपकाराची फेड अपकारानेच करायची असे ठरवलेले दिसते. बांगलादेशचे हंगामी प्रमुख डॉक्टर मोहम्मद युनूस हे भारताशी पंगा घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांच्या माध्यमातून भारताला एक उत्सापतखोर शेजारी लाभला आहे.

बांगलादेशचा नकाशा आंतरराष्ट्रीय पटलावर मांडताना डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी भारतातील ईशान्येकडील काही प्रांतबांगलादेशचे अविभाज्य भाग म्हणून दाखवले आहेत. त्यांची ही उचापत भारताने गांभीर्याने घेतली असून बांगलादेशचे कान चांगलेच पिळले आहेत. आसाम सारख्या काही प्रांतावर भविष्यात आपला हक्क सांगता यावा म्हणून त्यांनी केलेली ही उचापत आहे. सुमारे 40 वर्षांपूर्वी लोकसंख्येच्या माध्यमातून आसाम वर कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि तो केंद्र शासनाने मोडून काढला होता. एकेकाळी पाकिस्तानचा पूर्वेचा भाग असलेला बांगला हा पाकिस्तानी लष्कराने आपल्या दहशतीखाली आणि टाचेखाली आणला होता. या अन्याय आणि अत्याचारा विरोधात शेख मुजीबुर रेहमान यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर, पाक लष्कराचे हल्ले तेथील नागरिकांवर वाढले.
अशावेळी योग्य संधी साधून तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी भारतीय सैन्य बांगलादेशात घुसवले आणि पाकिस्तानी लष्कराचा न भूतो न भविष्यती असा पराभव करून बांगलादेश निर्माण केला. बांगलादेश मधील आजच्या तरुण पिढीला हा इतिहास कदाचित माहिती नसेल किंवा तो मुद्दाम करून दिला गेला नसेल. त्यामुळे तेथील युवक भारताची चांगले बोलताना दिसत नाहीत. बंगला मधील हिंदूंच्यावर तसेच हिंदू मंदिरांवर सतत हल्ले केले जातात. अगदी आजही या परिस्थितीत फरक पडलेला नाही उलट हल्ले वाढलेले आहेत आणि तिकडे या देशाचे हंगामी प्रमुख डॉक्टर मोहम्मद युनूस हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसतात. हिंदूंनी अल्पसंख्यांक म्हणून माझ्याकडे दाद मागायला येऊ नये तर बांगलादेशी नागरिक म्हणून माझ्याकडे यावे असे संतापजनक वक्तव्य काही दिवसांपूर्वी त्यांनी केले होते. याचा अर्थ त्यांना हिंदूंच्याकडे अल्पसंख्यांक म्हणून पहायचे नाही असे दिसते. बांगलादेशच्या भूतपूर्व पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यानंतर डॉक्टर मोहम्मद युनूस हे अस्वस्थ आहेत.
शेख हसीना यांना भारताने बांगलादेशच्या ताब्यात द्यावे असे ते तेथील न्यायालयाचा चेहरा बनून अधून मधून आवाहन करत असतात. पण त्यांच्या या आवाहनाला भारताकडून काडीचीही किंमत दिली जात नाही. हेच दुःख त्यांना अधिक दिसते. आणि म्हणूनच संधी मिळेल तिथे भारतावर टीका करायची, चुकीचे नकाशे तयार करायचे, ते जगासमोर मांडायचे असे उद्योग ते करताना दिसतात. डॉक्टर मोहम्मद युनूस हे अगदी सुरुवातीपासून (neighbor)भारताचे टीकाकार आहेत. शेख हसीना यांची सत्ता तेथील विद्यार्थी आणि युवकांनी उलथवून टाकल्यानंतर तेथील देशाचे हंगामी प्रमुख म्हणून डॉक्टर मोहम्मद युनूस यांची नियुक्ती करण्यात आली, बांगलादेशात अगडोंब उसळला होता तेव्हा हे महाशय फ्रांस मध्ये होते. सरकारचे हंगामी प्रमुख म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांनी लवकरच सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातील आणि लोकांच्या मनातील सरकार सत्तेवर येईल अशी घोषणा केली होती. पण अद्याप त्यांनी निवडणुका घेण्याच्या दृष्टीने एक पाऊलही पुढे टाकलेले दिसत नाही.
वास्तविक रक्तहीन क्रांतीच्या माध्यमातून एक नवीन मजबूत सरकार सत्तेवर येईपर्यंत हंगामी सरकार अस्तित्वात आणले जाते. या हंगामी सरकारच्या प्रमुखांनी देशातील कायदा आणि सुव्यवस्था पाहून निवडणुका जाहीर करावयाच्या असतात. आणि लोकांच्या मनातले सरकार सत्तेवर विराजमान करावयाचे असते. पण ही जबाबदारी डॉक्टर युनुस हे सक्षमपणे पार पाडत आहेत असे दिसत नाही. कारण त्यांनी अद्यापही निवडणुकांची घोषणा केलेली नाही. अशा प्रकारची कष्टाविना मिळालेली सत्ता सहसा कुणाला सोडवत नाही. डॉक्टर युनूस यांनाही सत्तेवर राहण्याचा मोह पडलेला दिसतो. शेख हसीना ह्या बांगलादेशच्या पंतप्रधान असताना बांगलादेशचे आणि भारताचे संबंध अतिशय चांगले आणि सुसंवादी होते. बांगलादेशचा समुद्र हा चीन किंवा अमेरिकेला त्यांचा हवाई तळ उभा करण्यासाठी दिला जाऊ नये आणि तसा तो दिला तर भारताला त्याचा अधिक त्रास होईल अशी भूमिका घेऊन भारताने पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते. कारण भारताला एक शांत राष्ट्र म्हणून बांगलादेश हवा होता.
जेव्हा शेजारी सुस्थितीत असतो तेव्हा त्याचे फायदे एकशेजारी म्हणून भारतालाही मिळत असतात. म्हणूनच एक स्थिर सरकार असलेला शेजारी म्हणून शेख हसीना यांच्या बांगलादेश कडे भारत पाहत होता. मोहम्मद युनूस यांना ते या देशाचे हंगामी प्रमुख असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत आणि तसा त्यांना अधिकारही नाही. पण जणू काही आपण लोकनियुक्त पंतप्रधान आहोत अशा अविर्भावात डॉक्टर युनूस दिसतात. त्यांनी भारत विषयक काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत आणि ते द्विपक्ष संबंधाला बाधा ठरणारे आहेत. बांगलादेशमध्ये लोकनियुक्त सरकार लवकरात लवकर सत्तेवरआणण्याची जबाबदारी डॉक्टर युनूस यांच्याकडे आहे पण या जबाबदारीचे भान त्यांचा आहे असे दिसत नाही.अन्यथा त्यांनी बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा कधीच केली असती.

डॉक्टर मोहम्मद युनूस हे नोबेल पारितोषक विजेते आहेत. एक ज्येष्ठ अर्थतज्ञ म्हणून त्यांची जगभर ओळख आहे. स्त्रियांना आत्मनिर्भर करण्यासाठी महिला बचत गट ही संकल्पना जगासमोर त्यांनी पहिल्यांदा मांडली. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांचे मोठेपण मान्य करावेच लागेल पण एक हंगामी सरकार (neighbor)प्रमुख म्हणून त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय चुकीची आणि उचापतखोरीची आहे. ज्या पाकिस्तानी लष्कराने बांगला जनतेवर अत्याचार केले त्या पाकिस्तानी लष्कर प्रमुखाशी तसेच तेथील राज्यकर्त्यांशी मैत्रीची भाषा ते करू लागले आहेत. आता त्यातून त्यांना भारताला डिवचावयाचे आहे.ईशान्य कडील काही प्रांत हे बांगलादेशचे आहेत असे नकाशाच्या माध्यमातून दाखवण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा त्याचाच एक भाग आहे.
हेही वाचा :
30 वर्षांनंतर ‘या’ राशींवर शनिदेव झाले प्रसन्न 5 डिसेंबरपर्यंत सोन्याचे दिवस
कॉटन कपडे धुताना रंग उडू नयेत यासाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स…
महिलेने अर्धनग्न अवस्थेतच इमारतीवरून मारली उडी, ‘त्या’ खोलीत काय सापडलं?