इचलकरंजी महानगरपालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांना(employee) त्यांच्या दीर्घकाळीन सेवेला मान्यता देत शासन निर्णयानुसार १०, २० व ३० वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर मिळणारी कालबद्ध पदोन्नती अद्याप मिळालेली नाही. या प्रलंबित पदोन्नती प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, भाजपा शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील व उपायुक्त राहुल मर्ढेकर यांना यासंदर्भात निवेदन सादर केले आहे.

दाभोळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांतील सर्व स्थायी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळानुसार कालबद्ध पदोन्नती देण्याचे नियम निश्चित केले आहेत. मात्र, इचलकरंजी महानगरपालिकेतील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना १०, २० किंवा ३० वर्षे सेवा पूर्ण होऊनसुद्धा ती पदोन्नती आजपर्यंत देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये या १०, २०, ३० वर्षांच्या प्रगती योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी या मागणी बाबतीत संबंधित विभागामार्फत तातडीने ही योजना लागू करावी सुचना देऊन हि अजुन अंमलबजावणी झाली नाही हि शासन ठराव क्रमांक ६७/२०२४ दिनांक २३-९-२०२४ तसेच १४ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी आदेशानुसार सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दाभोळे यांनी असेही स्पष्ट केले आहे की, ही सुविधा कर्मचाऱ्यांच्या(employee) सेवेत उत्साह, प्रेरणा व आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी अत्यावश्यक आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून शासन आदेशानुसार पात्र कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

अंडी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावीत की नाही?
काजोलच्या आधी ही प्रसिद्ध अभिनेत्री होती अजय देवगणची एक्स गर्लफ्रेंड..
भाजप नेत्या नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी…