बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकथा घडल्या आणि काळाच्या ओघात विस्मरणातही गेल्या. मात्र काही नाती अशी होती ज्यांची चर्चा आजही रंगते. अशाच एका गाजलेल्या प्रेमकहाणीबद्दल पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे — ती म्हणजे अजय देवगण आणि रवीना टंडन यांची. फार कमी जणांना हे माहित असेल की काजोलच्या(actress) आधी अजय देवगणचं नाव एका प्रसिद्ध आणि दमदार अभिनेत्रीशी जोडलं गेलं होतं. त्या काळी त्यांच्या अफेअरच्या बातम्या बॉलिवूडच्या गलियार्‍यात गाजत होत्या.

रवीना टंडन, जी आपल्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेती ठरली आहे आणि बॉलिवूडमध्ये २५ वर्षांहून अधिक काळ गाजली, तिचं नाव एकेकाळी अजय देवगणसोबत जोडलं गेलं होतं. या दोघांची ओळख ‘दिलवाले’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी झाली आणि तिथूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. चित्रपटात त्यांच्या केमिस्ट्रीचं भरपूर कौतुक झालं आणि त्यांचे अफेअर चर्चेचा विषय ठरले.मात्र त्याच काळात अजयने करिश्मा कपूरसोबत ‘जिगर’ चित्रपटावर काम सुरू केलं आणि तिथे त्याचं नाव करिश्मासोबत जोडले जाऊ लागलं.

हे पाहून रवीना मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली, इतकंच नव्हे तर तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही बातमी समोर आली. मात्र अजय देवगणने लगेचच या सर्व गोष्टींना “खोटं आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न” असे म्हणत फेटाळून लावले.
अजयने माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितलं होतं की, “रवीना कधीच माझी मैत्रीण नव्हती. ती केवळ कल्पनांच्या जगात जगते. तिची ही आत्महत्येची बातमी फक्त प्रसिद्धीसाठी होती.” तर रवीनानं (actress)मात्र दावा केला होता की अजयने तिला प्रेमपत्रे लिहिली होती आणि नंतर तिला फसवलं.

यावर अजय म्हणाला होता, “जर तिच्यात हिंमत असेल तर ती ती पत्रे सर्वांसमोर आणावी. ती पत्रे तिनंच स्वतःलाच लिहिली आहेत.”या वादानंतर अजय आणि रवीना दोघांनीही आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं. काही वर्षांनंतर अजय देवगण आणि काजोलचं प्रेम फुललं आणि त्यांनी लग्न केलं. मात्र अजय-रवीना यांचं हे गाजलेलं नातं आजही बॉलिवूडमधील सर्वात वादग्रस्त प्रेमकथांपैकी एक म्हणून ओळखलं जातं.

हेही वाचा :

नशीब पूर्णपणे बदलण्याआधी मिळतात हे 4 संकेत…
चक्रीवादळाचा धोका हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा…
शिंदे गटाला मोठा हादरा, ‘हा’ नेता भाजपमध्ये जाणार…