सध्या मराठी मनोरंजन विश्वात एक धक्कादायक चर्चा रंगत आहे. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून प्रचंड लोकप्रिय झालेलं स्टार कपल योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. गेल्या वर्षीच, म्हणजेच 3 मार्च 2024 रोजी या दोघांनी लग्न करून आपल्या चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता. पण लग्नाच्या अवघ्या वर्षभरातच त्यांच्या विभक्त(divorce) होण्याच्या बातम्या समोर येत आहेत.

योगिता आणि सौरभ या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचं आणि त्यांच्या लग्नाचे फोटो डिलिट केल्याचं लक्षात आलं आहे. इतकंच नव्हे, तर दिवाळीसारख्या सणाच्या काळातही दोघांनी एकत्र फोटो शेअर न केल्याने चाहत्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे जोडपं कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा पोस्टमध्ये एकत्र दिसत नाही.

‘जीव माझा गुंतला’ मालिकेदरम्यान योगिता आणि सौरभ यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या मनावर(divorce) राज्य करत होती. मालिकेतील “अंतरा” आणि “मल्हार” ही पात्रं घराघरात लोकप्रिय झाली होती, आणि याच मालिकेच्या सेटवर दोघांचं प्रेम फुललं होतं. त्यामुळे त्यांच्या लग्नाची बातमी आली तेव्हा चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

मात्र आता, दोघांच्या नात्यात खरोखरच दुरावा आला आहे का, की हे फक्त अफवा आहेत — याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, दोघेही सध्या एकत्र राहत नसल्याची माहिती समोर आली आहे. चाहत्यांना मात्र अजूनही आशा आहे की, या चर्चांमागचं खरं कारण लवकरच समोर येईल आणि हे लाडकं स्टार कपल पुन्हा एकत्र दिसेल.
हेही वाचा :
नशीब पूर्णपणे बदलण्याआधी मिळतात हे 4 संकेत…
चक्रीवादळाचा धोका हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा…
शिंदे गटाला मोठा हादरा, ‘हा’ नेता भाजपमध्ये जाणार…