पावसाळा म्हणजे अनेक आजरांचे सावट! स्वतःचे करा रक्षण, आजारांपासून ठेवा अंतर

पावसाळा म्हणजे आल्हाददायक वातावरण, पण त्याचबरोबर काही(monsoon) संसर्गजन्य आजारांनाही आमंत्रण! पावसात संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे हळद, आल्याचा चहा, लसूण, ताजी फळे व भाज्या यांचा आहारात समावेश करून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा.

पावसात चिखल, पाणी व घाण साचल्यामुळे हातांवर जीवाणू साचण्याची शक्यता(monsoon) अधिक असते. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार हात धुणे अत्यंत आवश्यक आहे.
पावसात पाण्यातील दूषितता वाढते. टायफॉईड, गॅस्ट्रो, कॉलरा सारख्या (monsoon) पाण्यावाटे होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच वापरा.
पावसात ओले कपडे, बूट घालून राहिल्यास सर्दी, ताप, त्वचाविकार होण्याची शक्यता असते. ओले झाले तर शक्य तितक्या लवकर कपडे बदलावेत.
पावसात स्ट्रीट फूड दूषित होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे भेळ, पाणीपुरीसारखे खुले पदार्थ टाळावेत आणि घरचे ताजे अन्नच खावं.
पावसात साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांपासून बचावासाठी मच्छरदाणी, क्रीम, आणि घरात फॉगिंग करा.

हेही वाचा :

पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर.. 

SL vs BAN सामना थांबवला, मॅचमध्ये आला खास पाहुणा! मैदानावर गोंधळ, नक्की कारण काय?

वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान