महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं (rain)जोरदार आगमन झालं असून, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकं पाण्याखाली गेल्याने शेतीचे नुकसान वाढत आहे.दरम्यान, राज्यावर आणखी एका नैसर्गिक संकटाचं सावट घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मेथी’ चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र तीव्र दाबात परिवर्तित होण्याची चिन्हं दिसत आहेत.

या बदलत्या हवामानामुळे कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असून, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा (rain)देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.दरम्यान, गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर वादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. समुद्रात प्रचंड खळबळ माजली असून, उंच लाटा किनाऱ्यावर धडकताना दिसत आहेत. पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत किनाऱ्यावरील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.

सध्या रत्नागिरीसह आजूबाजूच्या भागात जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तास कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला असून, शेतकरी आणि मच्छीमारांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा :

तरुणाच्या जुगाडाने सर्वच हादरले, हेल्मेट भेटला नाही म्हणून चक्क टीव्ही लावली डोक्यावर… Video Viral
पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टची बेकायदेशीर विक्री रद्द करा — दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाईची सकल जैन समाजाची मागणी
”तू जिथे भेटशील तिथे चप्पलने मारेन टकल्या”, ‘या’ दिग्दर्शकावर भडकली राखी सावंत…