‘ड्रामा क्वीन’ (Drama Queen)राखी सावंतने सलमान खानला पुन्हा एकदा समर्थन दिले आहे. यावेळी तिने अभिनव कश्यपवर टीका केली आहे, ज्याने काही दिवसांपूर्वी सलमान खानवर आरोप केले होते. “दबंग” च्या दिग्दर्शकाचे नाव न घेता, राखीने त्याला “चप्पल” मारण्याची धमकी दिली आहे.गेल्या काही आठवड्यांपासून, अभिनव कश्यप सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत आहे. त्याचबरोबर, दिग्दर्शकाने अलीकडेच आमिर खानला “धूर्त कोल्हा” म्हटले आणि शाहरुख खानसाठी म्हटले की त्याने भारत सोडून दुबईत स्थायिक व्हावे. आता राखी सावंतने अभिनवची तीव्र टीका करत सांगितले की तो हे सर्व ‘पैशांसाठी’ करत आहेत.

राखी सावंतने(Drama Queen) एका मुलाखतीत सांगितले, “तू जिथे कुठे भेटशील टकल्या तुला चप्पलने मारीन! कोणीतरी त्याला दबंग चित्रपटात दिग्दर्शक म्हणून कामावर ठेवले होते. मला माहित नाही की तो कोण आहे, म्हणून मी त्याचे नाव घेणार नाही. त्या टकल्याचे नाव घेऊन मी माझं तोंड खराब करणार नाही.” राखी सावंतने आरोप केला की अभिनव कश्यपने सलमानच्या संसाधनांचा दुरुपयोग सुरू केला होता, म्हणून त्याला प्रोजेक्टमधून काढण्यात आले. तिने हेही सूचित केले की अभिनव कदाचित सलमानच्या एखाद्या शत्रूच्या प्रभावाखाली होता. राखीनुसार, हे लोक बाहेरून सलमान खानची बदनामी करण्यासाठी पैसे घेतात.

सलमान खानला पाठिंबा देत राखी सावंतने म्हणाली, “भाई ला किसिंग सीन आवडत नाहीत. तो पृथ्वीवरील जिवंत देव आहे. तो नेहमीच त्याच्या सहकलाकारांचा आणि महिलांचा आदर करतो.” राखी एवढ्यावरच थांबली नाही; तिने ‘दबंग’ च्या सेटवर अभिनव कश्यपवर गैरवर्तनाचा आरोप करत सांगितले, “तो सेटवर महिलांशी फ्लर्ट करायचा.”

हेही वाचा :

आयुष्य पणाला लावून व्यक्तीने तोंडात फोडला रॉकेट, आगीच्या ज्वाळांनी जळून निघाला चेहरा अन् धक्कादायक Video Viral
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम
गरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार; पीएम आवास योजनेचे नव्याने अर्ज सुरू..