केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर (housing)मिळावे या उद्देशाने विविध गृहनिर्माण योजना राबवत आहे. त्यापैकी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ही अत्यंत महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमजोर, कमी उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना १.२० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे त्यांचे “स्वतःच्या घराचे स्वप्न” साकार होऊ शकते.

सरकारने या योजनेअंतर्गत “अंगीकार २०२५” अभियान सुरू केले आहे, ज्यामध्ये सरकारी अधिकारी घराघरांत जाऊन पात्र लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन करणार आहेत. पात्र ठरलेल्या नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदानाबरोबरच कमी व्याजदरावर कर्जाची सुविधा देखील दिली जाणार आहे.
योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी pmaymis.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन(housing) नोंदणी करू शकतात. अर्ज करताना आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि संपत्तीची कागदपत्रे अपलोड करावी लागतात. तसेच, ज्यांना ऑनलाइन अर्ज करता येत नाही त्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज सादर करू शकतात.

या योजनेमुळे ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना आपले घर बांधण्याचे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी मिळाली आहे. केंद्र सरकारचा उद्देश आहे की २०२५ पर्यंत प्रत्येक नागरिकाकडे स्वतःचे सुरक्षित आणि टिकाऊ घर असावे, ज्यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावेल.
हेही वाचा :
भाजप नेत्याने कारखाली चिरडून शेतकऱ्याला मारले; अल्पवयीन मुलींचे कपडे फाडले…
Youtube आणि Disney मध्ये वाढला तणाव, 31 ऑक्टोबरपासून नाही दिसणार हे लोकप्रिय चॅनेल्स
कोल्हापूरमध्ये शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न…