कोल्हापूरमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडून झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी बेनिक्रे (ता. कागल) येथील शिक्षक(Teacher)शंकर पांडुरंग रामशे (वय ५०) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर ज्वालाग्रही पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे हा प्रकार टळला असून, शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणी रामशे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रामशे यांची बेनिक्रे गावात गट क्रमांक ४८ मध्ये वडिलोपर्जित शेती आहे. या जागेत त्यांनी नारळाची झाडे लावली असून, पत्र्याचे शेड आणि संरक्षक भिंतही बांधली होती. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या शेताच्या शेजारील रस्त्याबाबत रामशे यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. मात्र, जुलै २०२५ मध्ये निर्णय त्यांच्या विरोधात लागल्यानंतर त्यांनी वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल केले. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्या शेताची संरक्षक भिंत आणि नारळाची झाडे उद्ध्वस्त केली.

या अन्यायाविरोधात त्यांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधले आणि कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही दिला होता. शनिवारी दुपारी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि अचानक अंगावर ज्वालाग्रही (Teacher)पदार्थ ओतून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस रवी आंबेकर यांनी तत्काळ झडप घालून त्यांना ताब्यात घेतले, तर अग्निशमन दलाचे जवान सुरेंद्र जगदाळे, विक्रम कुंभार आणि सतीश यादव यांनी त्यांच्या हातातील कॅन हिसकावून घेतला.

या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला. रामशे यांनी अधिकार्‍यांच्या मनमानीविरोधात आवाज उठवला असून, त्यांच्या शेतीचे नुकसान करणार्‍या अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम…
इथे जीव मुठीत ठेवून वाहने चालवावी लागतात!
सोनं खरेदीदारांना सर्वात मोठा दिलासा; सोनं ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त…