१ नोव्हेंबर २०२५ पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम(rules) लागू होत आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि खिशावर होणार आहे. हे बदल आधार कार्ड, बँकिंग, क्रेडिट कार्ड, म्युच्युअल फंड आणि पेमेंट सिस्टीमशी संबंधित आहेत. वेळेवर अपडेट न राहिल्यास नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

प्रथम, UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. आता नागरिकांना नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक यांसारखी मूलभूत माहिती अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची गरज राहणार नाही. हे सर्व बदल ऑनलाईन पद्धतीने करता येतील(rules). फक्त बायोमेट्रिक माहिती (जसे फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन) अपडेट करण्यासाठी केंद्रावर जाणे आवश्यक असेल. याशिवाय, UIDAI आता पॅन, पासपोर्ट, रेशन कार्ड, मनरेगा आणि शालेय नोंदी यांसारख्या सरकारी डेटाबेसशी माहिती आपोआप पडताळणार आहे, ज्यामुळे कागदपत्रे अपलोड करण्याचा त्रास संपणार आहे.

दुसरा महत्त्वाचा बदल एसबीआय क्रेडिट कार्डधारकांसाठी आहे. १ नोव्हेंबरपासून असुरक्षित क्रेडिट कार्डांवर ३.७५ टक्के शुल्क लागू करण्यात आले आहे. तसेच, CRED, CheQ, Mobikwik सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सद्वारे जर शाळा किंवा कॉलेजची फी भरली, तर त्यावर १ टक्का अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. मात्र, शाळेच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा POS मशीनद्वारे पेमेंट केल्यास कोणतेही शुल्क लागणार नाही. तसेच, ₹१,००० पेक्षा जास्त रकमेचा वॉलेट लोड केल्यास त्यावरही १ टक्का शुल्क भरावे लागेल.

गुंतवणूकदारांसाठी SEBI नेही म्युच्युअल फंड क्षेत्रात पारदर्शकता वाढवण्यासाठी नवे नियम लागू केले आहेत. आता कोणत्याही AMC चे अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक ₹१५ लाखांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार करत असतील, तर ही माहिती कंपनीच्या अनुपालन अधिकाऱ्याला देणे बंधनकारक राहील.बँकिंग क्षेत्रातही मोठा बदल होत आहे. १ नोव्हेंबरपासून ग्राहक आता आपल्या खात्यासाठी, लॉकरसाठी किंवा सेफ कस्टडीसाठी(rules) एक नव्हे तर चार नॉमिनीपर्यंत नियुक्त करू शकतील. हा बदल Banking Law Act 2025 अंतर्गत लागू होणार आहे. ग्राहक प्रत्येक नॉमिनीला ठरावीक टक्केवारीने हिस्सा देऊ शकतात आणि जर पहिला नॉमिनी अनुपस्थित असेल, तर त्याचा हिस्सा आपोआप दुसऱ्या नॉमिनीकडे हस्तांतरित होईल.

हेही वाचा :

इथे जीव मुठीत ठेवून वाहने चालवावी लागतात!
सोनं खरेदीदारांना सर्वात मोठा दिलासा; सोनं ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त…
राज्यावर मोठं संकट; हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा…