मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांसाठी(farmers) आणि घरगुती वीज ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने आता केवळ ५ रुपयांमध्ये नवीन वीज कनेक्शन देण्याची योजना सुरू केली आहे. यामुळे कृषी पंप किंवा घरासाठी कनेक्शन घेणे सुलभ होणार असून, विशेषतः रब्बी हंगामात शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

मध्यप्रदेश सरकारने मध्य क्षेत्र विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या सहकार्याने ही ‘सहज सरल बिजली संयोजन योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना अत्यंत कमी खर्चात कायदेशीर वीज जोडणी उपलब्ध करून देणे हा आहे. अनेकदा महागड्या कनेक्शन शुल्कामुळे अनेकजण वीज जोडणी घेणे टाळतात किंवा वीज चोरीचा मार्ग अवलंबतात.
या योजनेमुळे केवळ शेतकऱ्यांवरील(farmers) आर्थिक भार कमी होणार नाही, तर राज्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वीजचोरीलाही आळा बसेल, असा विश्वास वीज वितरण कंपनीने व्यक्त केला आहे. रब्बी हंगामासाठी तात्पुरते कनेक्शन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना विशेष लाभदायक ठरणार आहे. कमी खर्चात कायदेशीर कनेक्शन मिळाल्याने शेती आणि सिंचनासाठी त्यांना मोठा आधार मिळेल.
वीज वितरण कंपनीने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन वैध कनेक्शन घ्यावे. वैध कनेक्शनशिवाय वीज वापरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशाराही कंपनीने दिला आहे. विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार अशा व्यक्तींवर मोठा दंड आकारला जाऊ शकतो, न्यायालयात खटला दाखल होऊ शकतो आणि त्यांना शिक्षा देखील होऊ शकते.

या योजनेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. बैतूल जिल्ह्याच्या आकडेवारीनुसार, येथील तिन्ही विभागांमध्ये आतापर्यंत एकूण १३,०९१ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये ७,३८८ नवीन कृषी पंप कनेक्शन आणि ५,७०३ घरगुती कनेक्शनचा समावेश आहे. वैध कनेक्शन घेतल्याने कायदेशीर त्रास टाळता येतो आणि नियमित वीज पुरवठ्याची खात्री मिळते, असे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा :
तरुणाच्या जुगाडाने सर्वच हादरले, हेल्मेट भेटला नाही म्हणून चक्क टीव्ही लावली डोक्यावर… Video Viral
पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टची बेकायदेशीर विक्री रद्द करा — दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाईची सकल जैन समाजाची मागणी
”तू जिथे भेटशील तिथे चप्पलने मारेन टकल्या”, ‘या’ दिग्दर्शकावर भडकली राखी सावंत…