इचलकरंजी, दि. २७ : पुणे येथील शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग(Jain Boarding) ट्रस्टच्या जागेची बेकायदेशीर विक्री रद्द करून ती पुन्हा जैन समाजाच्या नावावर करण्यात यावी, तसेच या गैरव्यवहारात सहभागी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी तीव्र मागणी इचलकरंजीतील सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात समाज प्रतिनिधींनी प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन दिले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील जैन बोर्डिंग(Jain Boarding) ट्रस्टची जागा ही सार्वजनिक ट्रस्टची असताना तिला खोट्या पद्धतीने प्रायव्हेट ट्रस्ट दाखवून विक्री करण्यात आली. हा अत्यंत गंभीर आणि समाजाच्या विश्वासघाताचा प्रकार असल्याचे जैन समाजाने सांगितले. “पब्लिक ट्रस्ट”ची मालमत्ता “प्रायव्हेट ट्रस्ट” म्हणून विकण्यामागे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असून, त्यांच्या विरुद्ध सक्त कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
जैन समाजाच्या मालमत्तांवर गेल्या काही काळात सातत्याने अन्यायकारक व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले असून, शासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहावे आणि अल्पसंख्यांक समाजाच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी भूमिका समाजाने मांडली. “या प्रकरणात त्वरित न्याय झाला नाही, तर राज्यभर जैन समाज आंदोलनाचा इशारा देईल,” असा इशाराही काही समाजनेत्यांनी दिला.

या प्रसंगी भ. महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष गुंडाप्पा रोजे, श्री महावीर दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष अजित खंजिरे, श्री पद्मप्रभू दिगंबर जैन मंदिराचे दीपक पाटणी, श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अभिजित पटवा, तसेच श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराचे सचिव अशोक मगदुम, श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष शेषराज पाटणी, श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब चौगुले, श्री शांतिनाथ दिगंबर स्वाध्याय मंडळाचे अध्यक्ष बाळासो पाटील, श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष अनिल बमन्नावर, यांच्यासह सुभाष बलवान, सुकुमार पोते, संजय मगदुम, मोहन चौगुले आणि एच. एन. डी. बोर्डिंगचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देताना चंद्रकांत पाटील,गुंडाप्पा रोजे,अजित खंजिरे व इतर
हेही वाचा :
”तू जिथे भेटशील तिथे चप्पलने मारेन टकल्या”, ‘या’ दिग्दर्शकावर भडकली राखी सावंत…
आयुष्य पणाला लावून व्यक्तीने तोंडात फोडला रॉकेट, आगीच्या ज्वाळांनी जळून निघाला चेहरा अन् धक्कादायक Video Viral
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम