सोनं(gold) आणि चांदीच्या दरात मागील आठवड्यात झालेली घसरण या आठवड्याच्या सुरुवातीलाही कायम आहे. दिवाळीपूर्वी गगनाला भिडलेले दर आता कमी होत असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लग्नसराईच्या तोंडावर दर कमी झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.सोमवारी वायदे बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा डिसेंबर वायदा तब्बल १०८६ रुपयांनी कमी होऊन १,२३,२६५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. दिवाळीपूर्वी सोन्याने १.३५ लाखांचा टप्पा गाठला होता, मात्र आता दररोज हजारो रुपयांची घट होत आहे.

सराफा बाजारातही ही घसरण दिसून येत आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा(gold) भाव १,१५,४१० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२५,६१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मागील आठवड्याप्रमाणेच या आठवड्याची सुरुवातही ग्राहकांसाठी आनंददायी ठरली आहे.सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव आता १,५४,९०० रुपयांवर आला आहे. दिवाळीपूर्वी २ लाखांच्या घरात गेलेली चांदी आता लक्षणीयरीत्या स्वस्त झाली आहे. मागील काही दिवसांत चांदी एका दिवसात १०,००० रुपयांनी आणि ६,००० रुपयांनीही स्वस्त झाल्याचे पाहायला मिळाले.

दिवाळीनंतर आता लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. या काळात सोने-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. सहसा दिवाळीनंतर दर वाढलेलेच दिसतात, मात्र यंदा दर कमी झाल्याने हा लग्नसराईचा हंगाम ग्राहकांसाठी शुभ ठरू शकतो.

हेही वाचा :

राज्यावर मोठं संकट; हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा…
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी होणार या बड्या शिवसेना नेत्याची सून…
जयसिंगपूर मधील उदगाव येथे पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा डोके ठेचून खून..