दिवाळी सणानंतर सोन्याच्या(Gold) झळाळीला उतरती कळा लागली आहे. गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात सतत घसरण होत असून, मंगळवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रतितोळा तब्बल ₹3,500 ने कमी झाला. तर चांदीच्या दरात ₹4,000 किलोमागे इतकी घट नोंदवली गेली.आठवडाभरातच सोन्याचा भाव ₹12,000 प्रतितोळा तर चांदीचा दर ₹45,000 किलोमागे इतका खाली आला आहे. विशेष म्हणजे, दर कमी असूनही सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ घटली असल्याचे निरीक्षण जळगावमधील आर.सी. बाफना ज्वेलर्सचे मालक सुशील बाफना यांनी व्यक्त केले.

दिवाळी काळात सोन्याचे (Gold)दर तब्बल ₹1,31,000 प्रतितोळा इतके उच्चांक गाठले होते, तर चांदीची किंमत ₹1,91,000 किलोमागे पोहोचली होती. या कालावधीत देशभरात सोन्याची विक्री मोठ्या प्रमाणात झाली — एकूण 460 टन, तर केवळ मुंबईतच 320 टन सोने विकले गेले.मात्र, लक्ष्मीपूजनानंतर सतत सुरू असलेल्या दरकपातीमुळे बाजारात मंदीचे वातावरण आहे. सध्या पुणे, जळगाव, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील बाजारात सोन्याचा दर ₹1,18,800 प्रतितोळा, तर चांदीचा दर ₹1,45,000 किलोमागे इतका नोंदवला जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील दरातील अस्थिरता आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण ही या किंमतकपातीमागील प्रमुख कारणे आहेत. दिवाळीनंतर गुंतवणूकदार आणि ग्राहक आता बाजारातील पुढील हालचालीकडे लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा :

पुण्यातला मुळशी पॅटर्न?
अबू धाबीच्या वाळवंटात HOT पोझ देताना दिसली नताशा, सोशल मीडियावर नव्या फोटोची चर्चा
स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! लवकरच एंट्री करणार नवा ब्रँड