दिवाळीपूर्वी गगनाला भिडलेले सोन्याचे दर आता खाली येऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण आजही कायम असून, २४ कॅरेट सोन्याचा भाव (prices)लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. विशेषतः जळगावच्या सुवर्णनगरीत मोठी घट नोंदवली गेली. लग्नसराईच्या तोंडावर आलेली ही स्वस्ताई खरेदीदारांसाठी दिलासादायक ठरत आहे.

गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात (prices)मोठी घसरण झाली आहे. जळगावच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२२,५०० रुपयांवरून १,१८,५०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. ही तब्बल ४ हजार रुपयांची मोठी घट आहे. दिवाळीपूर्वी हेच दर १.३५ लाखांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते, मात्र गेल्या दहा दिवसांपासून दरांमध्ये सातत्याने घट होत आहे.
देशातील सराफा बाजारातही ही घसरण दिसून येत आहे. बुलियन असोसिएशनच्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर १,२०,३८० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेटचा दर १,१०,३४८ रुपये आणि १८ कॅरेटचा दर ९०,२८५ रुपये आहे. चांदीच्या दरातही मोठी घट झाली असून, एक किलो चांदीचा भाव १,४६,३०० रुपयांवर आला आहे. चांदीच्या दरातही गेल्या काही दिवसांत मोठी पडझड झाली आहे.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत येत असलेले सकारात्मक संकेत आणि मजबूत झालेला डॉलर यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरावर दबाव आला आहे. मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने इतर चलनधारकांसाठी सोन्याचे आकर्षण कमी झाले आहे.

याशिवाय, अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत असल्याने गुंतवणूकदारांचा कल शेअर बाजारासारख्या जोखमीच्या गुंतवणुकीकडे वळला आहे. तसेच, गेल्या काही महिन्यांतील विक्रमी तेजीनंतर गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात नफावसुली केली जात आहे, ज्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात (prices)घट होत आहे. बॉण्ड यील्डमधील वाढ आणि भू-राजकीय तणाव कमी झाल्यानेही सोन्याचे आकर्षण कमी झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, केंद्रीय बँकांची खरेदी आणि जागतिक अनिश्चितता यामुळे दरांना काही प्रमाणात आधार मिळत आहे.
हेही वाचा :
अंडी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावीत की नाही?
काजोलच्या आधी ही प्रसिद्ध अभिनेत्री होती अजय देवगणची एक्स गर्लफ्रेंड..
भाजप नेत्या नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी…