दिवाळीनंतर सोन्याच्या (Gold)दरात सातत्याने घसरण होताना दिसतेय. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील दहा दिवसांत सोन्याचे दर तब्बल 10 हजारांनी घसरले आहेत. तर एक किलो चांदीच्या दरात 13000 रुपयांची घसरण नोंदवली आहे.

आज सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. आपण जर मागच्या 10 दिवसांचा आलेख पाहिला तर 21 ऑक्टोबर रोजी प्रतितोळा 24 कॅरेट सोन्याच्या किंमत 130580 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होती. तर, आज सोन्याच्या किंमत 120490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. म्हणजेच जवळपास 10090 रुपयांनी सोन्याचे दर घसरले आहेत.
दरम्यान आज चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. यावेळीही 10 दिवसांचा हिशोब पाहिल्यास 21 ऑक्टोबर रोजी 1 किलो चांदीची किंमत 1645000 रुपये इतकी होती. तर, आज 1 किलो चांदीची किंमत 151000 रुपये प्रति किलो आहे. म्हणजेच जवळपास 13000 रुपये किलोंनी चांदीचे दर उतरले आहेत.
आज 24 कॅरेट सोन्याच्या (Gold)दरात 1,910 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा सोनं 1,20,490रुपयांवर पोहोचलं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1750 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा 1,10,450 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1430 रुपयांनी कमी झाले असून 90,370 रुपयांवर पोहोचले आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?
- 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,10,450 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,20,490 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 90,370 रुपये - 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,045 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,049 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,037 रुपये - 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 88,360 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 96,392 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 72,296 रुपये - मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,10,450 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,20,490 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 90,370 रुपये
हेही वाचा :
30 वर्षांनंतर ‘या’ राशींवर शनिदेव झाले प्रसन्न 5 डिसेंबरपर्यंत सोन्याचे दिवस
कॉटन कपडे धुताना रंग उडू नयेत यासाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स…
महिलेने अर्धनग्न अवस्थेतच इमारतीवरून मारली उडी, ‘त्या’ खोलीत काय सापडलं?