आजच्या महागाईच्या युगात सर्वसामान्यांच्या जगण्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या दहा वर्षांत महागाईने इतकी झेप घेतली आहे की अनेकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडू लागली आहे. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांचा फायदा जमिनीवर फारसा दिसत नाही. अशा परिस्थितीत अनेक घरांतील कर्ते पुरुष डबल ड्युटी करून कुटुंब चालवतात, तर काही ठिकाणी स्त्रिया घरखर्चाला हातभार लावतात. पण सध्याच्या काळात काही साईड बिझनेस (business)आयडियाज अशा आहेत, ज्यातून महिन्याला सहज 20 ते 25 हजार रुपयांची कमाई करता येऊ शकते.

जर तुमच्याकडे कंटेंट रायटिंग, ग्राफिक डिझाईनिंग, वेब डेव्हलपमेंट किंवा डिजिटल मार्केटिंगसारखे कौशल्य असेल, तर तुम्ही Fiverr, Upwork सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करून चांगली कमाई करू शकता. सुरुवातीला छोटे प्रकल्प घेऊन ग्राहकवर्ग वाढवता येतो आणि दरमहा फक्त 10-12 तास काम करून 15-25 हजार रुपये सहज मिळवता येतात.तसेच, जर तुम्ही गणित, इंग्रजी, विज्ञान किंवा इतिहास या विषयात निपुण असाल, तर ऑनलाईन ट्युशन घेऊन उत्पन्न मिळवता येते. ग्रामीण भागातील अनेक शिक्षक परदेशातील विद्यार्थ्यांना शिकवून डॉलरमध्ये कमाई करत आहेत. आठवड्याच्या शेवटी काही तास वर्ग घेऊनही चांगले उत्पन्न मिळते.

याशिवाय, Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स साइट्सवर अ‍ॅफिलिएट मार्केटिंग करूनही पैसे मिळवता येतात. योग्य उत्पादने निवडून त्यांच्या विक्रीस मदत केल्यास प्रत्येक वस्तूवर कमिशन मिळते.सध्या ड्रॉपशिपिंग हा एक लोकप्रिय ऑनलाइन व्यवसाय बनला आहे. यात तुम्हाला वस्तू साठवण्याची किंवा खरेदी करण्याची गरज नसते. तिसरा पक्ष उत्पादन डिलिव्हर करतो, आणि तुम्हाला नफा मिळतो. Shopify आणि WooCommerce सारख्या साइट्स या व्यवसायासाठी उपयुक्त ठरतात.

ऑफलाइन कमाईची इच्छा असणाऱ्यांसाठी विकेंड मार्केट ही उत्तम संधी आहे. आठवड्याच्या अखेरीस सेल, विक्री मेळा किंवा धमाका ऑफरच्या माध्यमातून तुम्ही होममेड प्रॉडक्ट्स, स्नॅक्स किंवा गिफ्ट (business)आयटम्स विकू शकता. ग्राहकांशी संपर्क वाढवून सोशल मीडियावर नेटवर्क तयार करून व्यवसाय वाढवण्याचीही संधी मिळते.या सर्व पर्यायांमुळे सध्याच्या महागाईच्या काळात अतिरिक्त उत्पन्न मिळवणे आता पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे.

हेही वाचा :

प्रेयसीला भेटायला गेलेल्या पतीच्या मागे पत्नीही लपून छपून पोहचली, मग जे घडलं… घरातच सुरु झाला आखाडा; Video Viral
कारचालकाने महिलेवर चिखल उडवला म्हणून ताईंनी त्याचा असा बदला घेतला की… पाहून सर्वांनीच वाजवल्या टाळ्या; Video Viral
खासदार संजय राऊत घेणार राजकीय ब्रेक,नेमकं कारण काय?