कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

काही वर्षांपूर्वी प्रवीण तरडे निर्मित”मुळशी पॅटर्न” (pattern)हा मराठी आणि हिंदी सिनेमा मोठा पडदा गाजवून गेला. मोकळ्या जागा आणि शेत जमिनी यांना सोन्याचा भाव आल्यानंतर सामान्य माणसांच्या जागा आणि शेत जमिनी कशा बळकावल्या जातात याचा भेदक चित्रण या चित्रपटात होतं. आता धार्मिक आणि शैक्षणिक जागांवर बिल्डर आणि डेव्हलपर कंपन्यांची वक्रदृष्टी कशी वळली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणून पुण्यातील जैन धर्मीय मंदिर आणि विद्यार्थ्यांचे वस्तीगृह या जागेच्या झालेल्या”बाजारा”कडे पहावे लागेल. अशा व्यवहारात शासकीय आणि निमशासकीय यंत्रणा किती गतिमान होतात हे सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या समोर आलेले आहे.

पुण्यात जैन मंदिर आणि विद्यार्थी वस्तीगृह सुमारे साडेतीन एकर जमीन परिसरात आहे. आजचा बाजार भाव प्रमाणे या जागेची किंमत किमान अडीच हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. मंदिर आणि वस्तीगृह असलेल्या या जमिनीचा बाजार 231 कोटी रुपयांमध्ये करण्यात आला. विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि विशाल गोखले यांची भागीदारी असलेल्या कंपनीने ही जागा विकत घेतल्याचे प्रकरण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी बाहेर काढले. त्यानंतर कोल्हापूरचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी या व्यवहाराविरुद्ध आवाज उठवला, जैन मुनींनीलोक आंदोलन उभे केले आणि हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्राच्या सर्व सामान्य जनतेसमोर आले.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी थोड्या उशिरा या आंदोलनाची दखल घेतली, ज्या कंपनी बरोबर हा व्यवहार झाला आहे त्या कंपनीत माझी भागीदारी आहे पण मंत्री झाल्यानंतर मी या कंपनीची सर्व प्रकारचे संबंध तोडले. पण जैन समाजाची ही जागा पुन्हा समाजाकडे परत केली जाईल असे आश्वासन त्यांनी जैन मुनीना दिले. त्यानंतर जागा खरेदीचे झालेले साठे खत विशाल गोखले यांच्या कंपनीने मागे घेतले. आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. जैन समाजाची बाजू मांडणारे वकील योगेश पांडे यांनी उपस्थित केलेले मुद्दे खळबळ माजवणारे आहेत. सर्वसामान्य माणसाने एखादी जागा विकत घेतली की ती त्याच्या नावावर होण्यासाठी कितीतरी दिवसांची त्याला प्रतीक्षा करावी लागते आणि तरीही त्यासाठी त्याला टेबलाखालून पैसे द्यावे लागतात. पुण्यातील या जागेच्या व्यवहारात शासकीय आणि निमशासकीय यंत्रणा अतिशय गतिमान झालेल्या दिसल्या.

कोणत्यातरी बड्या व्यक्तीचा राजकीय दबाव असल्याशिवाय शासकीय यंत्रणा अशा अचानक गतिमान होत नाहीत. आणि हा दबाव कोणाचा होता हे आता लोकांच्या समोर आलेले आहे. ही जागा विकत घेण्यासाठी मोहोळ आणि गोखले यांच्या कंपनीला काही तासात वित्तीय संस्थेकडून कर्ज उपलब्ध होते. काही तासात जैन(pattern) समाजाची जागा कंपनीच्या नावावर चढते. बँकेचा बोजा त्या जमीन व त्यावर असलेल्या वास्तूवर चढवला जातो. इथे मात्र चक्क जैन मंदिरच कर्जाच्या बोजाखाली आले आहे.पुण्यातील वालचंद नावाच्या दानशूर व्यक्तीने ही सुमारे साडेतीन एकर जागा जैन समाजाच्या विश्वस्त मंडळाला काही अटी शक्ती घालून दिली. या जागेचा वापर मंदिर, आणि शैक्षणिक या उद्देशासाठीच करावयाचा आहे. अशी प्रमुख अट घालण्यात आलेली असून ही अट बे दखल केली गेली आहे.

या सर्व व्यवहारात विश्वस्त मंडळाचे विश्वस्त गुंतलेले आहेत. साडेतीन एकर वर उभी असलेली वस्तीगृहाची वास्तु भक्कम असूनही ती धोकादायक स्थितीत आहे, तिचा जीर्णोद्धार करण्यासाठी पैसे नाहीत अशी काही कारणे विश्वस्त मंडळांने दिली आहेत शिवाय ज्या विकसकाला ही जमीन विक्री केली गेली आहे त्यांनी वस्तीगृहासाठी साडेतीन हजार चौरस फूट बांधकाम असलेली वास्तू विश्वस्त मंडळाला देण्याचे मान्य केले आहे असा युक्तिवाद विश्वस्त मंडळाने केल्यानंतर त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली. येत्या काही दिवसात हा वादग्रस्त व्यवहार रद्द होईल. पण त्यातून मुळशी पॅटर्न उघड झाला आहे.काही वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातील लोकांच्या निवासासाठी आरक्षित असलेला प्राईम लोकेशन मधील एक भूखंड एक बोगस हाऊसिंग सोसायटी स्थापन करून काही कोटी रुपयात शासनाकडून घेतला गेला.

प्रत्यक्षात या जागेची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे 50 कोटी रुपये होईल ती जागा अवघ्या दोन अडीच कोटी रुपयांमध्ये हाऊसिंग सोसायटीने घेतली.हा व्यवहार सुद्धा विद्युत वेगाने पार पडला. शासनाकडे निर्धारित केलेले रक्कम भरणे, संस्थेच्या नावावर जागेचे हस्तांतरण होणे, आणि जागेचा सातबारा होणे ही प्रक्रिया केवळ 24 तासात पूर्ण करण्यात आली होती. आजही हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे(pattern).महानगरांमधील मोक्याच्या मोकळ्या जागा किंवा मोकळ्या जागेवर असलेली बांधकामे यांना सोन्याचा भाव आलेला आहे. बोक्याच्या भूखंडावरील वास्तू ही स्थानिक स्वराज्य संस्थेकडून धोकादायक म्हणून जाहीर करणे आणि नंतर तिचा बाजार करणे यासाठी एक भ्रष्ट साखळीच कार्यरत असते. ही साखळी केवळ पुण्यातच नाही तर सर्वच महानगरामध्ये सक्रिय असते आणि आहे.

हेही वाचा :

अबू धाबीच्या वाळवंटात HOT पोझ देताना दिसली नताशा, सोशल मीडियावर नव्या फोटोची चर्चा
स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! लवकरच एंट्री करणार नवा ब्रँड
अंडी आणि काजूपेक्षा जास्त प्रोटीन देतं हे ‘स्वस्त ड्रायफ्रूट्स’; मेंदू ते हृदय राहिल निरोगी