बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी एका विचित्र कारणामुळे. सोशल मीडियावर अफवा पसरली की पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी (terrorist)घोषित केले आहे. या दाव्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली, मात्र तपासाअंती हे सर्व दावे खोटे आणि बनावट असल्याचं स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कायद्याच्या चौथ्या यादीत सलमान खानचं नाव असल्याचा दावा करणारा एक “सरकारी दस्तऐवज” व्हायरल झाला होता. या दस्तऐवजाला पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाची नोटीस असल्याचं म्हटलं जात होतं, पण सत्य काही वेगळंच होतं.

तपासानंतर समोर आलं की, हा दस्तऐवज पूर्णपणे बनावट होता आणि डिजिटलरी तयार करण्यात आला होता. पाकिस्तानच्या कोणत्याही सरकारी वेबसाईटवर किंवा अधिकृत निवेदनात सलमान खानचं नाव अशा यादीत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय पाकिस्तानमधील कोणत्याही अधिकाऱ्याने याबद्दल काहीही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे सलमान खानवर लावण्यात आलेला हा दहशतवादाचा(terrorist) आरोप फक्त एक अफवा असल्याचं सिद्ध झालं आहे.
दरम्यान, सलमान खानच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. तो लवकरच ‘बॅटल ऑफ गलवान’ या बहुचर्चित सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान एक शूर भारतीय सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे. चित्रपटाचं शूटिंग अलीकडेच लडाखमध्ये पूर्ण झालं असून, तो पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय, सलमान सध्या ‘बिग बॉस 19’ च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमान खान गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असून, त्याची लोकप्रियता आजही तितकीच अफाट आहे. त्याच्या प्रत्येक सिनेमाची आणि टीव्ही शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. अशा परिस्थितीत त्याला दहशतवादी घोषित केल्याची बनावट अफवा पसरल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, मात्र सत्य बाहेर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
हेही वाचा :
पुढील ४८ तास धोक्याचे! मुसळधार पावसाचा इशारा…
शरद पवार गटातील ज्येष्ठ नेत्याच्या घरी चोरटयांचा दरोडा…
8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता..