बॉलिवूड आणि टीव्ही विश्वात नाती जशी जलद जुळतात, तशीच ती तुटतानाही पाहायला मिळतात. अशाच एका चर्चेत सध्या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडपं जय भानुशाली (actress)आणि माही विज आलं आहे. १४ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर दोघांनी परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जय आणि माही यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून, काही काळापासून दोघांमध्ये मतभेद सुरू असल्याचं बोललं जातंय. तथापि, दोघांकडून अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. काही महिन्यांपूर्वीही त्यांच्या नात्यातील दुराव्याबद्दल चर्चा रंगल्या होत्या, त्यावेळी माहीने या चर्चांवर थेट प्रतिक्रिया दिली होती.

एका मुलाखतीत माही म्हणाली होती, “जर आमचं घटस्फोट होतं आहे किंवा होऊ शकतं, यामध्ये लोकांनी का नाक खुपसावं? तुम्ही माझे वकील नाही किंवा कुटुंबीय नाही. प्रत्येक गोष्ट इतकी मोठी करण्याची काय गरज आहे?” तिने पुढे सांगितलं की, “लोक माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जयला वाईट किंवा मला वाईट म्हणतात. पण त्यांना आमचं खरं आयुष्य माहीत नाही. लोकांना वाटतं की घटस्फोट म्हणजे चिखलफेक, पण तसं नसतं.”जय आणि माही(actress) यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०११ मध्ये लग्न केलं होतं. दोघांना एक मुलगी आहे — तारा, जी त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. सोशल मीडियावर हे जोडपं वारंवार ताऱ्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दोघे एकत्र दिसत नसल्याने त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा अधिकच बळावल्या आहेत.

सध्या जय आणि माही यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी टीव्ही विश्वात आणि चाहत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडवली आहे. दोघेही या प्रकरणावर मौन बाळगत असले तरी लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :
गडकरी बोले, भाजपा लागे!
लाडक्या बहिणींना धक्का, ‘त्या’ महिलांची नावं यादीतून वगळली…
सलमान खानला पाकिस्तानने दशहतवादी का घोषित केलं…