कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
भारतीय जनता पक्षातील एक ज्येष्ठ नेते(leader)आणि केंद्रीय मंत्री श्रीयुत नितीन गडकरी हे स्पष्ट वक्ते आहेत. ते कोणत्याही व्यासपीठावरून लोकांना बरे वाटावे असे बोलत नाहीत. लोकांनी आत्मचिंतन करावे असेच ते बोलत असतात. त्यांचे बोलणे हे कोणाला परखड वाटते तर कोणाला फटकळ वाटते. स्वपक्षीय कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मात्र ते अधिक गांभीर्याने बोलत असतात. नागपूर येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी नव्या लोकांचे पक्षात जरूर स्वागत करा पण जुन्या कार्यकर्त्यांना मात्र विसरू नका असे आवाहन त्यांनी पक्षश्रेष्ठींना केले. राज्यात आणि देशात सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. ही सत्ता संपादन करताना भाजपने समविचारी पक्षांना सोबत घेतले आहे. महाराष्ट्रात भाजप बरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित दादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. एकनाथ शिंदे यांना बरोबर घेतल्यानंतर स्पष्ट बहुमता असतानाअजितदादा पवार यांना का घेतले? असा एक सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्र असलेल्या ऑब्झर्वर आणि साप्ताहिक विवेक मधून उपस्थित केला होता.

बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यां चे स्वागत करताना पक्षाचा पाया असलेल्या कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करू नका असे संघाच्या काहीनेत्यांनी पक्ष नेतृत्वाला सुनावले होते (leader) .सुमारे 40 वर्षापूर्वी इंदिरा काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात सुरू होते. तेव्हा निष्ठावंत आणि नंतर आलेले असा एक संघर्ष काँग्रेस आय मध्ये जोरात सुरू होता. आता चाळीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षामध्ये इतर पक्षातून इन्कमिंग वाढले आहे. त्यामुळे निष्ठावंत आणि नंतर आलेले असा सुप्त संघर्ष भाजपामध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.नितीन गडकरी यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांची बाजू घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांना उचित न्याय द्यावा. अन्यथा ज्या वेगाने पक्ष वाढला आहे त्याच वेगाने तो खाली सुद्धा येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. काही वर्षांपूर्वी भाजपचे खासदार दोनशे होते आणि नंतरच्या निवडणुकीत हा आकडा केवळ दोन वर आला होता. हा इतिहास भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना माहित नाही असे म्हणता येणार नाही.
तीन वर्षांपूर्वी कोल्हापुरात भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तेव्हा नव्याने निवडलेल्या जिल्हा कार्यकारणीवरच आक्षेप घेऊन ही कार्यकारांनी नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामध्ये जुने आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आलेले आहे अशा आशियाची लेखी तक्रारच काही कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. विशेष म्हणजे भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते बाबा देसाई ( ते आज हयात नाहीत) यांनी नाराज कार्यकर्त्यांचे नेतृत्व केले होते.इतर पक्षातून भाजपामध्ये आलेल्यांचे पक्ष सृष्टीकडून लाड केले जात आहेत. नवागतांना सावजी जेवण दिले जात आहे तर जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. अर्थात बाहेरून आलेले तुपाशी आणि मूळचे कार्यकर्ते उपाशी असे नितीन गडकरी यांना म्हणावयाचे आहे.भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता घडवला जातो. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संस्थांमधून तो भाजपामध्ये येत असतो. हा कार्यकर्ता विचाराने परिपक्व असतो. असे चित्र इतर राजकीय पक्षांमध्ये दिसत नाही. आणि म्हणूनच भाजपामध्ये जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे ही गडकरी यांची भूमिका रास्त आहे.

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीचा विशेषता भारतीय जनता पक्षाचा प्रभाव असणार आहे आणि म्हणूनच या निवडणुकी मध्ये जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी(leader) दिली गेली पाहिजे. निष्ठावंत आणि नव्याने आलेले असा विचार करून जुन्या कार्यकर्त्यांना सर्वाधिक संधी मिळाली पाहिजे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षा वाढलेल्या आहेत. त्यांना पक्षश्रेष्ठींनी न्याय दिला नाही तर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच चंद्रशेखर बावनकुळे यांनी आत्तापासूनच बंडखोरी कराल तर याद राखा असा इशारा द्यायला सुरुवात केली आहे. प्रसंगी पक्षाची दारे बंडखोरांसाठी पाच वर्षांसाठी बंद केली जातील असे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना धक्का, ‘त्या’ महिलांची नावं यादीतून वगळली…
सलमान खानला पाकिस्तानने दशहतवादी का घोषित केलं…
पुढील ४८ तास धोक्याचे! मुसळधार पावसाचा इशारा…