राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राजकीय पक्षांतराचे वारे जोरदार वाहत आहेत. विशेषतः सत्ताधारी महायुतीमध्येच इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू असल्याचे चित्र आहे. याचा फटका आता शिवसेना शिंदे गटाला बसला असून, सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रमुख नेते(leader) नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी, मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे.

राजकीयदृष्ट्या ही अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे, कारण नागनाथ क्षीरसागर हे मोहोळमधील माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. धक्कादायक म्हणजे, उद्या नागनाथ क्षीरसागर यांच्यासोबतच राजन पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत(leader). एकेकाळचे कट्टर विरोधक आता एकाच पक्षात येत असल्याने मोहोळच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतून अनेक नेत्यांनी महायुतीत प्रवेश केला होता. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीमधील मित्रपक्षांमधूनच (शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. या प्रकारामुळे मित्रपक्षांमध्ये नाराजी वाढत आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी यापूर्वीच जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.

सोलापुरात भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच आता शिवसेना शिंदे गटालाही धक्का दिला आहे. स्थानिक निवडणुका एकत्र लढणार असल्याचे महायुतीचे नेते सांगत असले, तरी प्रत्यक्षात मात्र मित्रपक्षांचेच नेते फोडण्याचे प्रकार सुरू असल्याने युतीतील संबंध ताणले जात आहेत.

हेही वाचा :

पुण्यातला मुळशी पॅटर्न?
अबू धाबीच्या वाळवंटात HOT पोझ देताना दिसली नताशा, सोशल मीडियावर नव्या फोटोची चर्चा
स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! लवकरच एंट्री करणार नवा ब्रँड