महायुती सरकारची महत्वाकांक्षी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण”(sisters) ही योजना राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी वरदान ठरली आहे. जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. सध्या राज्यभरात दोन कोटींपेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, अलीकडेच काही गैरप्रकार उघड झाल्यानंतर सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी X (ट्विटर) वर ट्विट करून नवी माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि लाभार्थींना वेळेवर निधी मिळावा यासाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. 18 सप्टेंबर 2025 पासून या योजनेची e-KYC सुविधा अधिकृत संकेतस्थळावर https://ladakibahin.maharashtra.gov.in उपलब्ध आहे.
मंत्र्यांनी स्पष्ट केलं की या प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, 18 नोव्हेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण न केलेल्या लाभार्थी महिलांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थींनी ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर लॉगिन करून आपला आधार क्रमांक व OTP द्वारे पडताळणी करावी लागेल. त्यानंतर जात प्रवर्ग निवडून काही आवश्यक घोषणांना मंजुरी द्यावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर “Success – तुमची e-KYC पडताळणी (sisters)यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.सरकारच्या या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेत अधिक पारदर्शकता येणार असून, पात्र महिलांना वेळेवर आर्थिक लाभ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का!
‘मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे’, सुपरवायझर म्हणाला, ‘कपडे काढा…
WhatsApp स्टेट्स ब्लर दिसतेय का? HD दिसण्यासाठी ‘ही’ सेटिंग करा..